गुन्हे विश्व

पार्किंग फी च्या नावाखाली खंडणी वसुली

नाना पेठेतील अल्पना थिएटरजवळील नागझरी भिंतीलगत बाबा लतीफ शहा दादापीर दर्गा वाहनतळाच्या नावाखाली अधिकृत पार्किग नसतानाही रिक्षा आणि दुचाकी चालकांना फसवून आणि धमकावून खंडणी वसूल करणाऱ्या आण्णा आंदेकरसह एकावर समर्थ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका 24 वर्षीय तरूणाने फिर्याद दिली आहे. आंदेकर याच्यासह सागर थोपटे (रा.नाना पेठ) याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पेठेमध्ये नागझरी भिंतीलगत अधिकृत पार्किंग नसतानाही बाबा लतीफ शहा दादापीर दर्गा वाहनतळच्या नावाने अधिकृत पार्किंग असल्याचे भासवून खोटे पावती पुस्तक छापून फिर्यादीकडून दोनदा धमकी देऊन आणि दहशत पसरवून 10 रूपये शुल्क वसूल करण्यात आले. याठिकाणी दररोज 350 ते 400 रिक्षा आणि दुचाकी पार्क होतात. त्यांच्याकडून पार्किंगच्या नावाखाली 3500 ते 4000 हजार रूपये खंडणी स्वरूपात वसूल केले जात आहेत. अशा प्रकारे नागरिकांकडून 90 हजार ते 1 लाख रूपये खंडणीद्वारे वसूल नागरिकांची फसवणूक केली जात आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खोपडे करीत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

5 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago