परिचारक पुन्हा पक्षासाठी ‘त्याग’ करण्याच्या तयारीत !

२५२ पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी  उमेदवारी अर्ज दाखल  करण्यास सुरुवात झाली असून १७ एप्रिल रोजी होणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेसकडून भगीरथ भालके हेच उमेदवार असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या आकस्मात निधनामुळे लागलेल्या या पोटनिवडणुकीत भालके सर्मथकांना स्व.आमदार भारत भालके यांनी थेट संर्पक आणि सहज उपलब्धता,जनतेच्या प्रश्नासाठी घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे जोडला गेलेला मतदार सहानुभूती आणि कृतज्ञता पोटी त्यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्या पाठीशी ठाम राहील असा विश्वास भालके सर्मथकांकडून व्यक्त केला जात असतानाच २०१४ आणि २०१९ च्या  निवडणुकीत स्व.आमदार भालके यांना प्रभावीपणे टक्कर देणारे परिचारक आणि आवताडे याची भूमिका काय ? ते कुठल्या पक्षाकडून लढणार ? याची उत्सुकता मतदार संघातील जनतेला लागली होती मात्र २०१९ ची निवडणूक अपक्ष लढलेले समाधान आवताडे जे जसे जिल्ह्याच्या राजकरणात गेल्या काही वर्षात भाजपा सोबत आहेत तसेच ते आता विधानसभेच्या मैदानात भाजपकडून उमेदवारी घेऊन लढण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.याच वेळी आर्थिक दृष्टया गोत्यात आलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुत्थानासाठी भूमिका घेत विविध पक्ष्याचे जेष्ठ नेते,सहकार आयुक्त,साखर आयुक्त,कामगार आयुक्त,सहकार मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करीत असतानाच तरुण होतकरू उद्योजक,उद्योग व्यवसाय आदी क्षेत्रातील पक्षनिरपेक्ष नागरिक आणि सर्वसामान्य तरुण याना सोबत घेऊन सक्षम अर्थकारण हाच राजकारणाचा हेतू या भूमिकेने अभिजित पाटील यांनी पंढरपूर शहर व तालुक्यात जोडलेला प्रचंड लोकसंग्रह त्यांना एक सक्षम राजकीय नेतृत्वाचा पर्याय स्वीकारण्यास भाग पाडण्यात यशस्वी ठरला आहे.आणि अशातच आता अभिजित पाटील यांनी भाजपाकडून उमेदवारीची मागणी केल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
         गेल्या चाळीस वर्षाच्या पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात पक्ष हि गौण बाब ठरली असून तालुक्याच्या राजकारणात अनेक पक्ष संघटना सक्रिय असल्या तरी परिचारक विरोधात आण्णा गट आणी परिचारक विरोधात विठ्ठल परिवार अशीच प्रभावी लढत झाल्याचे दिसून येते.मात्र २००९ साली या मतदार संघाची पुनर्र्चना झाली आणि मोहिते पाटील नको या भूमिकेतून पंढरपूर शहर व २२ गावात मतदान झाले आणि स्व.आमदार भारत भालके याना थेट मोठे मताधिक्य मिळाले.या निवडणुकीत स्व.भारत भालकेंचा विजय हा अपघाती होता असे सांगत प्रशांत परिचारक यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक लढविली मात्र मागील तीन निवडणुकीत प्रभावी तिरंगीचा फायदा मिळत आलेल्या परिचारक गटास जवळपास ९ हजार मतांनी हार पत्करावी लागली आणि समाधान आवताडे यांची शिवसेनेकडून असलेली उमेदवारी तोट्याची ठरल्याचा दावा परिचारक समर्थकांकडून करण्यात आला.२०१९ च्या निवडणुकीत पुन्हा अशीच प्रभावी तिरंगी लढत झाली पण याही निवडणुकीत सुधाकरपंत परिचारक हे पराभूत झाले आणि पुन्हा आवताडे यांची अपक्ष उमेदवारी कारण असल्याचा दावा काही परिचारक सर्मथकांनी केला होता.
     २०१७ मध्ये झालेल्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या अद्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी आवताडे- परिचारक हे एकत्र आले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दोन्ही नेत्यांना बळ दिले आता २०२१ च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव करून राष्ट्रवादीचे बलस्थान असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी बाबत नाराजी असल्याचे सिद्ध करण्याचा चंगच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी बांधला आहे.थेट सरळ सरळ लढत झाली आणी परिचारक यांनी साथ दिली तर आपण विजयी होऊ शकतो हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पटवून देण्यात दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे हे यशस्वी ठरल्याची चर्चा असून आज आमदार प्रशांत परिचारक यांनी आपलय समर्थकांच्या घेतलेल्या बैठकीत त्यांच्या शिवाय समाधान आवताडे,अभिजित पाटील व पंढरपूर नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अगदी नगण्य मते मिळविलेले प्रा.रोंगे हे इच्छुक असल्याचे सांगिलते असले तरी भाजपाकडून परिचारक याना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे आजच्या बैठकीतील त्यांच्या देहबोलीतून दिसून आल्याची चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये होत आहे. मात्र २००९ च्या निवडणुकीत परिचारक गटाने राष्ट्रवादी पक्षासाठी त्याग केला होता आता भाजपासाठी त्याग केला तरी तो वाया जाणार नाही,देवेंद्र फडणवीस नक्कीच योग्य वेळी योग्य संधी देतील असा आशावाद परिचारक सर्मथक करीत आहेत.                                   
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago