ताज्याघडामोडी

शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दप्रयोग

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करण्यावर बारामतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ ट्विटरवर शेफाली वैद्या नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने शेअर करत किती खोटं बोलणार असे म्हटले होते. याच व्हिडिओवर वेदश्री नावाच्या ट्विटर वापरकर्त्या तरुणीने पवारांबाबत आक्षेपार्ह ट्विट केले होते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अभिजीत जाधव आणि त्यांच्ये मित्र अजित कदम यांनी बारामती तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.

परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले या प्रकरणी शरद पवार यांनी दिल्लीमधील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी म्हटले आहे की, सचिन वाझे आणि गृहमंत्र्यांची भेट झाली नाही त्यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख हे क्वारंटाईन होते. हा व्हिडिओ पोस्ट करत शेफाली वैद्या नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने म्हटले आहे की, किती खोटं बोलणार याच पोस्टला कोट करत आक्षेपार्ह पोस्ट केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरोधात केलेली पोस्ट राष्ट्रवादी कार्यकर्ते अभिजित कदम यांनी पाहिली. यानंतर त्यांनी पोलीसांत तक्रार दाखल केली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

5 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

7 days ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

1 week ago

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशाचा पाऊस! रोज १०० कोटी रुपये; आतापर्यंत ४,६५० कोटी रुपये जप्त

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय…

2 weeks ago