ताज्याघडामोडी

स्वेरी फार्मसीच्या तीन विद्यार्थिनी सोलापूर विद्यापीठात सर्वप्रथम

स्वेरी फार्मसीच्या तीन विद्यार्थिनी सोलापूर विद्यापीठात सर्वप्रथम

पंढरपूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठसोलापूर मार्फत घेण्यात आलेल्या एप्रिल-मे २०२० या परीक्षेत स्वेरी संचलित बी. फार्मसीच्या  अंतिम वर्षाची परीक्षा दिलेल्या अपूर्वा जवंजाळईश्वरी शिदवाडकर व मोनिका मासाळ ह्या विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रथमद्वितीय व तृतीय क्रमांकाने सोलापूर विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवला.

           गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील ओसाड माळरानावर १९९८ साली स्वेरीची अर्थात श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट,  पंढरपूर या शिक्षण संकुलाची स्थापना झाली. पुढे स्वेरीला पालकांचा व विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागलास्वेरीतील शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळू लागले. सुरवातीला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा ओघ असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आज मोठमोठ्या शहरातील विद्यार्थी देखील प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. या चढत्या आलेखामुळे पंढरपूर पंचक्रोशीतील नागरिकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी फार्मसी महाविद्यालय देखील काढावे अशी मागणी जोर धरू लागली. नागरिकांच्या मागणीला स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांनी हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे अखेर सन २००६ साली बी.फार्मसीची स्थापना केली. अभियांत्रिकी प्रमाणेच पुढे फार्मसीचा देखील आलेख वाढतच राहिला. गेल्या वर्षी फार्मसीला राष्ट्रीय दर्जाचे एन. बी. ए. मानांकन देखील मिळाले. स्वेरीच्या बी. फार्मसीने देखील सोलापूर जिल्ह्यात अग्रेसर राहण्याचा मान   मिळविला. बी. फार्मसीच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये घेण्यात आलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत अपूर्वा संजय जवंजाळ (सीजीपीए -९.५६)ईश्वरी हेमंत शिदवाडकर (सीजीपीए-९.४४) व मोनिका सहदेव मासाळ (सीजीपीए-९.४२) या विद्यार्थिनी अनुक्रमे प्रथमद्वितीय व तृतीय आल्या. त्यांना बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियारवर्गशिक्षक प्रा. रामदास नाईकनवरे व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. प्रथम आलेल्या तीनही विद्यार्थीनींचे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदेउपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्तकॅम्पस इन्चार्जप्राचार्य डॉ. मिथुन मणियारस्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्यअधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारीविद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago