ताज्याघडामोडी

राष्ट्रपती पदक विजेता पोलीस अधिकारी लाच घेताना जाळ्यात

न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा जामीन करण्यासाठी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व एका पोलीस कर्मचाऱ्याला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. कामशेत येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) पथकाने शनिवारी (दि. 6) दुपारी 3.25 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली.

पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम व पोलीस कर्मचारी महेश दौंडकर असे ‘एसीबी’ने कारवाई केलेल्या तिघांची नावे आहेत. सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानीत करण्यात आले आहे. या प्रकरणी तक्रारदार हे मावळ पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय शेवाळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयात तक्रार दिली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अलका सरग यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवित्री संस्थेतील बनावट मतदार यादीत फसवणूक केल्याप्रकरणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी संचालक बाळासाहेब नेवाळे यांना 21 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. बाळासाहेब नेवाळे यांना वडगाव मावळ न्यायालयाने 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

वडगाव मावळ न्यायालयात जामीनाबाबत मदत करण्यासाठी 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानुसार 23 फेब्रुवारी रोजी अडीच लाख रुपये पोलिसांना दिले. 25 फेब्रुवारी रोजी न्यायालयात जामीन मिळवून देण्यासाठी काहीच मदत केली नाही. नेवाळे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.बाळासाहेब नेवाळे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. नेवाळे यांचा जामीन करण्यासाठी पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम व पोलीस कर्मचारी महेश दौंडकर यांनी काहीच मदत न केल्याने त्यांना उर्वरित रक्‍कम देण्याचे टाळले असता नेवाळे यांचा 10 मार्च रोजी जामीन असल्याने मदत करतो, असे म्हणून उर्वरित अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली जात होती.

तक्रारदार दत्तात्रय शेवाळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात तक्रार दिली. शनिवारी (दि. 6) रोख रक्‍कम एक लाख रुपये स्वीकारताना पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम व कर्मचारी महेश दौंडकर यांना अटक केली. त्यांची पाच तास चौकशी सुरू आहे. आरोपींवर कामशेत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस अधीक्षक राजेंद्र बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अलका सरग, सुनील क्षीरसागर, सुनील भिले, कर्मचारी वैभव गिरीगोसावी, रतेश थरकर, किरण चिमटे या पथकाने सापळा रचून कारवाई केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

6 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago