ताज्याघडामोडी

अनुभव आणि आत्मविश्वास यावर उद्योग अवलंबून – संचालिका सौ. प्रतिभा डोरले स्वेरीत ‘वूमन इंटरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ चे उदघाटन

अनुभव आणि आत्मविश्वास यावर उद्योग अवलंबून – संचालिका सौ. प्रतिभा डोरले

स्वेरीत वूमन इंटरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ चे उदघाटन

पंढरपूर- कोणत्याही उद्योगधंद्यामध्ये ‘सूक्ष्म निरीक्षण’ आणि ‘व्यापक दृष्टिकोन’ असला पाहिजे कारण या महत्वाच्या गोष्टींवरच उद्योगाचे यश अवलंबून आहे. यासाठी कोणताही उद्योग स्वीकारताना त्याचा सूक्ष्म अभ्यास करावा लागतो. उद्योग धंदे करताना महिलांना अनंत अडचणी येतात तरी त्यावर यशस्वीरीत्या मात करण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावर येऊन पडते. कोरोना कालावधीत महिलांनी प्रचंड सहनशीलतेने जबाबदारी पार पाडली. उद्योग धंद्यात यशापयश हे येतच असतात. आपणास अपयश आले की कोणीही काहीही बोलत असतात परंतु अशा काळात आपण संयम ठेवून इतरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. आपण एखादा उद्योग मनापासून केल्यास त्यात आपल्याला यश मिळू शकते. ‘दांडगा अनुभव’ आणि ‘आत्मविश्वास’ यावर उद्योग अवलंबून असतो. नोकरी करताना एकच पर्याय असतो तर उद्योग-धंद्यात अनेक पर्याय असतात. त्यासाठी यशस्वी उद्योग करणे महत्वाचे असते. उद्योग करत असताना मनात कोणताही न्यूनगंड बाळगू नये. उद्योगधंदा चिकाटीने करावा. उद्योग जगता मध्ये ‘नियोजन’ सर्वात महत्त्वाचे असते. नियोजनावर चढ-उतार अवलंबून असतात. कधी कधी नुकसान संभवते तर यात निराश न होता आणखी प्रयत्न केल्यास त्याच धंद्यात यश मिळू शकते. यासाठी कोणत्याही उद्योगधंद्यात नकारात्मक दृष्टीने पाहू नये.’ असे प्रतिपादन वेद संस्कृती ड्रग हाऊसच्या संचालिका सौ. प्रतिभा डोरले यांनी केले.

             महाराष्ट्र सेंटर फॉर इंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट(एमसीइडी) सोलापूर आयोजित इंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटऑफ इंडीया अँड डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजीगव्हर्मेंट ऑफ इंडिया प्रायोजित कार्यशाळेचे आयोजन श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये केले होते. महाराष्ट्र उद्योग केंद्रसोलापूर यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या दि. ०४ मार्च ते ०३ एप्रिल २०२१ असे एक महिनाभर चालणाऱ्या वूमन इंटरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (डब्ल्युइडीपी)’ या कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वेद संस्कृती ड्रग हाऊसच्या संचालिका सौ. प्रतिभा डोरले बोलत होत्या. प्रारंभी एमएसइडीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी पांडुरंग कांबळे यांनी प्रास्ताविकात ‘उद्योजकते’वर आधारित महिनाभर चालणाऱ्या कार्यशाळेसंबंधी माहिती देताना ‘महिला उद्योजक यशस्वी कसे होतात?’ हे त्यांनी पटवून व उदाहरणे देवून सांगितले. सध्याच्या काळात नोकरीपेक्षा उद्योग कसे महत्त्वाचे आहेतहे देखील सांगितले. उद्योजकते’ वर मार्गदर्शन करताना स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘उद्योजकतेवर आपण लक्ष केंद्रित करताना अनेक प्रश्न उद्भवतात आणि हे प्रश्न चर्चेने आणि सहकार्यातून सोडविले तर कोणताही उद्योग अवघड वाटणार नाही. यासाठी कोणताही उद्योग करताना त्याच्या पार्श्वभूमीपासून त्या उद्योगाच्या वितरण व्यवस्थेपर्यंतची जबाबदारी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडावी लागते. उद्योगात करिअर करताना आपल्या मानसिकतेत देखील अमुलाग्र बदल करावा लागतो. शिक्षण घेण्यासाठी आणि उद्योजक बनण्यासाठी कशीही परिस्थिती असू दे त्याचा उद्योगावर काहीही परिणाम होत नसतो. त्यासाठी परिस्थितीचा बाऊ करू नये. इच्छाशक्तीच्या आणि प्रचंड परिश्रमाच्या बळावर मोठा बदल घडू शकतो. यासाठी पहिल्यांदा मोठी स्वप्न पहा आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रचंड परिश्रम करा.’ असे सांगून डॉ. बी.पी. रोंगे यांनी यशस्वी उद्योजक बनण्यासाठी विशेष कानमंत्र दिला. यावेळी पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठसोलापूर तर्फे डॉ.बी.पी.रोंगे यांना उत्कृष्ठ प्राचार्य पुरस्कार’ मिळाल्याबद्धल महाराष्ट्र उद्योग केंद्राच्या वतीने जिल्हा प्रकल्प अधिकारी पांडुरंग कांबळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गुरुराज इनामदार यांनी केले. यावेळी जिल्हा समन्वयक उत्तरेश्वर सापतेडॉ. मीनाक्षी पवारएमबीए चे विभागप्रमुख प्रा. करण पाटीलएफडीपी समन्वयक प्रा. मिनल भोरेतसेच महिला शिक्षक वर्गप्राध्यापक उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago