ताज्याघडामोडी

आणखी एका राजकारण्याचे विवाहबाह्य संबध जाहीर करणार, प्रवीण दरेकरांचा गौप्यस्फोट

मुंबई : राज्य विधी मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे जोरदार मोर्चेबांधनी सुरू आहे.  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सत्ताधारी पक्षाच्या आणखी एका आमदारावर गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे, शिवसेनेचे मंत्री आणि आमदार संजय राठोड(sanjay rathod) यांच्या नंतर विरोधकांच्या निशाण्यावर कोण आहेत असा प्रश्न जनतेला पडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कलाकार रेणू शर्मा कथित बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले होते. याप्रकरणी राज्यातील बड्या नेत्यांनाही प्रतिक्रीया देणे भाग पडले होते. धनंजय मुंडे यांचे प्रकरण निवळल्यानंतर टीकटॉकस्टार पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी शिवसेनेचे आमदार आणि मंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे. 

आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांचे नाव जोडले गेल्याने भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी आक्रमकपणे लावून धरली होती. आता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीतील आणखी एका आमदाराचा पर्दाफाश करणार असल्याचा इशारा दिला आहे. 

प्रवीण दरेकर यांनी विधीमंडळाबाहेर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ‘ सत्ताधारी पक्षातील एका आमदाराचादेखील पर्दाफाश आज विधीमंडळात करणार आहे. संबधित आमदाराची डीएनए चाचणी करावी अशी मागणी न्यायालयात प्रलंबित आहेत. तथाकथित पत्नी आणि मुलगा यांनीही त्यांच्या डिएनए टेस्ट मागणी केली होती. 

परंतू पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नाही. सरकारने या आमदाराची चौकशी करावी. अशी मागणी सभागृहात करणार आहे, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणीदेखील तू मारल्यासारखे कर, तू रडल्यासारखे कर. असे सुरू आहे. त्यामुळे संजय राठोडांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला जात नाहीये’. 

महाविकास आघाडीचा आणखी कोणता नेता किंवा आमदार भाजपच्या निशाण्यावर आहे. याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला अडचणीत आणण्यासाठी भाजप चांगलाच आक्रमक झालेला सध्या दिसून येत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

21 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

7 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago