ताज्याघडामोडी

शिक्षिकेला कोरोना, 100 विद्यार्थी क्वारंटाईन

कोल्हापूर : कोरोनाच्या संकटामुळं अनेकठिकाणी शाळा-कॉलेज बंदच आहेत. जिथं शाळा-कॉलेज सुरू झाली तिथं कोरोनाचा संसर्ग वाढला. अशीच परिस्थिती असेल तर कोरोनाच्या संकटात दहावी आणि बारावीच्या परीक्षा कशा होणार, असा सवाल आता उपस्थित होतो आहे.

कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये लक्ष्मीबाई पाटील गर्ल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील एका शिक्षिकेला कोरोनाची लागण झाली. त्यामुळं ज्युनिअर कॉलेजातील 100 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांना क्वारंटाईन करावं लागलं. या शिक्षिकेचा पती कोरोना पॉझिटिव्ह असतानाही ती शाळेत शिकवायला येत होती, अशी माहिती समोर आली आहे.

या सगळ्या प्रकाराबद्दल पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, शाळा-कॉलेजात अशी परिस्थिती असेल तर यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा कशा होणार, असा सवाल आता उपस्थित होतो आहे.

यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा होऊच नयेत, असा एक सूर आहे. मात्र सरकारनं त्याबाबत अजून अंतिम निर्णय घेतलेला नाही. शाळा-कॉलेज सुरू झाले नाहीत तर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं आहे. सुरू झाली तर कोरोनाचा संसर्ग वाढतोय. त्यामुळं शाळा चालक, शिक्षकांसह विद्यार्थी-पालकांचीही अडचण झाली आहे. अशा परिस्थितीत दहावी आणि बारावीच्या परीक्षा कशा घ्यायच्या, हे मोठं आव्हानच असणार आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

6 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशाचा पाऊस! रोज १०० कोटी रुपये; आतापर्यंत ४,६५० कोटी रुपये जप्त

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय…

2 weeks ago