ताज्याघडामोडी

साताऱ्यात पेट्रोलने भरलेल्या दोन विहिरी

सातारा, 03 मार्च : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री लागली आहे. चोरांनीही आता पेट्रोलकडे मोर्चा वळवला असून साताऱ्यात पेट्रोल चोरीसाठी चक्क पेट्रोल वाहून नेणारी पाईपलाईन फोडली आहे. धक्कादायक म्हणजे, पेट्रोल पाईपलाईन तशीच सोडून दिल्यामुळे परिसरातील विहिरीत पेट्रोलच पेट्रोल झाले आहे.

पेट्रोल चोरीसाठी चोरट्यांनी पेट्रोल वाहून नेहणारी पाईपलाईन फोडल्याची घटना उजेडात आली आहे. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मुंबई-पुणे-सोलापूर या 223 किलोमीटर पाईपलाईनला साताऱ्यातील सासवड गावाजवळ चोरट्यांनी भगदाड पाडले. लाखो रुपयांचे पेट्रोल चोरट्यांनी चोरून नेले.

पण, पेट्रोल चोरी केल्यानंतर फोडलेली पेट्रोलची पाईपलाईन तशीच ठेवून चोर पसारा झाले. त्यामुळे

हजारो लिटर पेट्रोलचा जमिनीत निचरा झाला. पेट्रोल जमिनीत मुरल्याने पाईपलाईन असलेल्या परिसरातील दोन विहिरी पेट्रोलने भरल्या आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एवढंच नाहीतर शेतातील उभ्या पिकांचे देखील नुकसान झाले आहे.

विहिरीत पेट्रोल आल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. गावातील लोकांनी विहिरीजवळ एकच गर्दी केली आहे. पण, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीच्या परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. खबरदारी म्हणून अग्निविरोधक यंत्र विहिरीजवळ ठेवण्यात आले असून अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी हजर आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

4 hours ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 week ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago