ताज्याघडामोडी

पूजा चव्हाण प्रकरणाला नवं वळण, वडिलांची चुलत आजीविरोधात तक्रार

बीड : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. पूजाचे वडील लहूदास चव्हाण यांनी शांताबाई राठोड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. परळी शहर पोलिसात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पाच कोटी घेतल्याचा आरोप करून बदनामी केल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.

संजय राठोड यांनी पूजा चव्हाणच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे ते काही बोलणार नाहीत. असा आरोप पूजाची चुलत आजी शांता राठोड यांनी केला होता. पूजाचे वडील लहूदास चव्हाण यांनी तर असं देखील म्हटलं की, शांताबाई या आमच्या नातेवाईक नाहीत.

आजही विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाचा मुद्दा चर्चेत राहिला. पूजा चव्हाण मृत्यू प्रकऱणी सर्व पुरावे हाती असतानाही आणि या प्रकरणाला 20 दिवस उलटूनही  अजून एफआयआर का दाखल झाली नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला आहे. 12 ऑडिओ क्ल्पिमध्ये थेट पुरावे असूनही पोलीस का काम करत नाही असा सवालही त्यांनी यावेळी सभागृहासमोर उपस्थित केला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago