भटुंबरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंडाबाई ढवळे तर उपसरपंचपदी पूजा खांडेकर यांची निवड

पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंडाबाई भारत ढवळे यांची बिनविरोध निवड कऱण्यात आली तर उपसरपंच पदासाठी पूजा अमरसिह खांडेकर व राजाबाई पांडुरंग गडदे यांचे अर्ज आल्याने झालेल्या मतदान प्रक्रियेत पूजा अमरसिह खांडेकर यांनी ९ पैकी ६ मते मिळवून विजय संपादन केला.  १५ जानेवारी २०२१ मध्ये पार पडलेल्या भटुंबरे ग्रामपंचातीच्या निवडणुकीत लोकसेवा ग्रामविकास आघाडीने ९ पैकी ६ जागांवर विजय प्राप्त केला होता.यानंतर झालेल्या आरक्षण सोडतीत सरपंच पद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी निघाले होते.या निवडीनंतर नूतन सरपंच,नूतन उपसरपंच व लोकसेवा ग्रामविकास आघाडीच्या ग्रा.प.सदस्यांचा ग्रामस्थाच्या वतीने सत्कार करण्यात आला.     

भटुंबरे ग्राम पंचायत कार्यालयात झालेल्या निवड प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री ननवरे व ग्रामसेविका सौ. गायकवाड यांनी काम पाहिले.यावेळी फांचीराम शिंदे,भारत शेंबडे,लक्ष्मण खांडेकर,भीमराव शिंदे,दत्तात्रय येडगे,अंकुश शेंबडे,पंडित शेंबडे,शिवाजी तावसकर,सुरेश शिंदे,राजाभाऊ जाधव,तात्या सलगर,भय्या कांबळे,संतोष शिंदे,नवनाथ वाघमारे,भीमा गायकवाड,विकास डांगे,पोपट शिंदे,शिवाजी सलगर,अजय खांडेकर,भाऊसो ढवळे,अक्षय डांगे,नाना पवार,आबा जाधव,नवनाथ खांडेकर,मोहन खांडेकर,बाबा येडगे,अर्जुन लोखण्डे,संजय शिंदे,अंकुश शिंदे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

20 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago