ताज्याघडामोडी

आ.प्रशांत परिचारक नेतृत्वाखाली शुक्रवारी नगर पालिकेसमोर धरणे आंदोलन

पंढरपूर नगर पालिकेच्या वतीने शहरातील गोपाळपूर रस्त्यावरील नगर पालिकेच्या मालकीच्या सर्व्हे नं.१७ ब मध्ये शहरातील बेघर व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना परवडणाऱ्या किमतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंर्तगत घरे देण्याच्या हेतूने उभारणी करण्यात येत असलेल्या प्रकल्पास नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिलेली स्थगिती उठवावी अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह नगरविकास विभागाचे प्रधान सचिव,नगर परिषद संचनालय आयुक्त व जिल्हाधिकारी सोलापूर आदींना देण्यात आले असून २५ फेब्रुवारी पर्यंत सदर प्रकल्पावरील स्थागिती न उठविल्यास शुक्रवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी आ.प्रशांतराव परिचारक यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनात नगराध्यक्षा साधना भोसले यांच्यासह शहर भाजपचे सर्व पदाधीकारी,पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी व भाजपचे सर्व नगरसेवक संभाव्य घरकुल लाभार्थी यात सहभागी होणार आहेत.       

    पंढरपूर शहरात प्रधानमंत्री घरकुल योजनेची प्रभावी अमलबजावणी करणेसाठी व संपूर्ण शहराचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रकल्प सल्लागार नियुक्त करून त्या अहवालानुसार शहरातील सर्व्हे क्रमांक १७ ब येथे भागीदारी तत्वावर परवडणारी घरे या योजनेअंतर्गत प्रकल्प अहवाल तयार  करून राज्यशासनाकडून आवश्यक त्या मंजुऱ्या प्राप्त करून या २०९२ घराच्या प्रकल्पाची महारेरा नोंदणी करण्यात आली.या योजनेचे काम प्रगतीपथावर असून पहिल्या टप्प्यातील ८९२ घरकुलांचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे.लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप करण्याकरता पारदर्शक प्रक्रिया राबविण्यात येत असताना व लॉटरी पद्धतीने घरकुलांचे वाटप करण्यासाठी २६ जानेवारी रोजी सोडतही काढण्यात येणार होती मात्र शहरातील काही संघटनांनी राजकीय हेतूने खोट्या तक्रारी करून या प्रकल्पास स्थगिती मिळविली आहे.हि स्थगिती तातडीने उठवण्यात यावी अशा आशयाचे फॅक्सद्वारे निवेदने पाठवण्यात आली असून २५ फेब्रुवारी पर्यंत राजकीय हेतूने दिलेली हि स्थगिती न उठविल्यास आ.प्रशांतराव परिचारक यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन केले जाईल अशी माहिती भाजपचे शहर अध्यक्ष विक्रम शिरसट यांनी दिली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

3 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

6 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago