ताज्याघडामोडी

पंढरपूर नगरपरिषदे समोर खोकेधारकांचे बुधवारी धरणे आंदोलन पंढरीतील ते बसलेले व्यवसाय मोडीत काढनारी ती निविदा रद्द करा

पंढरपूर :प्रतिनिधी
पंढरपूर नगरपरिषदेने नुकतीच जाहीर केलेली जा.क्र./पंनपं/नअ/ ४३२/२०२१ दि ०९/०२/२०२१ ही निविदा ही निविदा म्हणजे बसलेले व्यवसाय मोडीत काढून खर्च करणाऱ्यावर अन्याय करणारी निविदा आहे. तरी ती निविदा रद्द करावी अन्यथा येत्या बुधवार दि17 फेब्रुवारीधरणे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा खोकिधरक यांनी दिला आहे.
या काढण्यात आलेल्या निविदामध्ये पंढरपूर शहरातील सि. स. नं. ३६९२ पैकी मध्यप्रदेश भवन समोरील शौचालय युनिट शेजारी गोपाळपूर रोडवर नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेवर व्यवसायासाठी ३ बाय ६ चौ. मी. मोजमापाची लोखंडी दुकाने नगरपरिषदे मार्फत तयार करुन २ वर्षे ११ महिने मुदतीने भाड्याने दिली जाणार आहेत. त्या दुकानांसाठी नापरतावा आधिमूल्य कमीत कमी रक्कम रुपये १,५०,०००/- आहे. यावर जास्तीत जास्त रकमेच्या निविदा मंजूर करण्यात येणार आहेत. अशी निविदा भरण्यासाठी व्यावसायिकांना रुपये ५००/- फॉर्म फी व रुपये ५,०००/- अनामत भरणे आवश्यक असल्याचे आपण जाहीर केलेल्या उपरोक्त विषयांकित निविदेमध्ये नमूद केले आहे. ही निविदा म्हणजे उपरोक्त जागेचा विकास करण्यासाठी अनेक वर्षांपासून अनंत हाल अपेष्टाचा सामना करीत वेळोवेळी पूर परिस्थितिशी झुंज देत आज पर्यंत रुपये १,५०,०००/- च्या कितीतरी पटीने अधिक खर्च करून आपला व्यवसाय टिकवून उदरनिर्वाह करणाऱ्या स्थानिक व्यवसायीकांच्या धडपडीची अवहेलना असून कोरोना संकटात मृतवत झालेल्या, व्यवसायिकांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा निंदनीय राक्षसी प्रकार म्हणावा लागेल. म्हणून आम्ही पंढरपूर नगरपरिषदेची उपरोक्त निविदा त्वरित मागे घेण्याची विनंती करीत आहोत. तसेच पंढरपूर नगरपरिषदेने उपरोक्त जागेवर उभारण्यात येणारी लोखंडी दुकाने सद्या अस्तित्वात असलेल्या आम्हा व्यावसायिकांना मे.सर्वसाधारण सभा ठराव क्र.६६ दिनांक १८/०७/२०१८ ने ठराव की ( अ.वि.क्र.११ )  मध्ये नमूद ठरावास आधीन राहून अत्यल्प भाड्याने देण्यात यावीत. त्यानंतरच उर्वरित दुकानांचा बाजार मांडावा अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे केली जाणार आहे.
   आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्हा व्यावसायिकांना दि. १७/०२/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजले पासून आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याने त्याची सर्वस्वी जबाबदारी पंढरपूर नगर परिषदेची राहील. एखाद्या जागेचा गरजवंताकडून मोफत विकास करून घेण्यासाठी जाणीवपुर्वक कानाडोळा करायचा आणि ती जागा पूर्ण विकसित झाल्यानंतर अतिक्रमणाचे नाव देत गरजू व्यावसायिकांना देशोधडीला लावायचे आणि पुन्हा अशा निविदा काढून पुतणा मावशीचे प्रेम दाखवायचे असे प्रकार कदापि खपवून घेतले जाणार नाहीत. त्यासाठी आम्हास बलिदानाची तयारी करावी लागली तरी चालेल, अशा स्वरूपाचे निवेदन खोकेधारकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. तसेच पंढरपुरातील सर्व राजकीय, सामाजिक संघटनांनी आंदोलनामध्ये सहभाग नोंदवण्याचे आवाहन ही करण्यात आले आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

1 day ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 week ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago