शरदचंद्र पवार यांची आणि माझी भेट झाली,नमस्कार केला एवढाच संर्पक -उमेश परिचारक

मंच कुठला हे न पाहता वर्तविले जात आहेत पक्षप्रवेशाचे अंदाज ?  

पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक यांची किंगमेकर म्हणून ओळख आहे.राजकीय सत्तेच्या प्रत्यक्ष पदापासून दूर राहून देखील राजकीय घडामोडीवर प्रचंड नियंत्रण असलेला नेता म्हणून ते ओळखले जातात.१९९२ मध्ये विद्यमान आमदार प्रशांत परिचारक यांनी तालुक्याच्या सक्रिय राजकरणात प्रवेश केला मात्र याच वेळी परिचारक गटाच्या वाटचालीत उमेश परिचारक हे किंगमेकरच्या भूमिकेत वावरताना दिसून आले.प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय होऊन विविध राजकीय पदे भूषविणे अथवा सत्तास्थाने भूषविणे त्यांना फारसे कठीण नसताना केवळ पंढरपूर-मंगळवेढा विकास आघडीचे अध्यक्ष आणि पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक एवढीच काय ती राजकीय पदे ते बाळगून आहेत.मात्र याच वेळी त्यांनी मंगळवेढा तालुक्यात कचरेवाडी येथे युटोपियन शुगरची उभारणी करून कृषी औद्योगिक क्षेत्रात आपला ठसा उमटविला.स्व.आ. भारत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी कॉग्रेसचा उमेदवार कोण ? यावर चर्चेच्या मैफिली रंगत असताना अफवांचे गुऱ्हाळ देखील सुरु झाले असल्याचे दिसून येते.       

    गेल्या काही दिवसात आ.प्रशांत परिचारक हे राष्ट्रवादीत जाणार,राजकीय भूकंप होणार अशा चर्चेला ऊत आला होता.मात्र आता भूकंप पार्ट टू च्या नावाखाली पुन्हा एकदा दोन्ही तालुक्यात उमेश परिचारक आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एका स्टेजवर,उमेश परिचारक हे राष्ट्रवादीत जाणार ? अशी चर्चा होताना दिसू लागली.या मागील सत्य जाणून घेण्यासाठी पंढरी वार्ताकडून थेट उमेश परिचारक यांच्याशी या भेटीत नक्की काय घडले हे जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता नान्नज तालुका उत्तर सोलापूर येथील कृषिभूषण दत्तात्रय काळे स्व.आ.सुधाकरपंत परिचारक यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते.कृषिभूषण दत्तात्रय काळे यांचे खास आमंत्रण होते  म्हणून मी गेलो.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची आणि माझी भेट झाली,नमस्कार केला एवढाच संर्पक अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.     

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा नान्नज दौरा हा खाजगी होता.कृषिभूषण दत्तात्रय काळे यांनी द्राक्षाच्या नवीन किंगबेरी या वाणाच्या लोकार्पण सोहळ्यास जिल्ह्यातील विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनाही सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आग्रही आमंत्रण दिले होते.या कार्यक्रमाच्या मंचावर पहिल्या रांगेत जेष्ठ नेते शरद पवार हे आरूढ होते तर दुसऱ्या रांगेत उमेश परिचारक हे आरूढ होते.जिल्ह्यातील भाजपचे जेष्ठ नेते आ.सुभाष देशमुख हेही या मंचावर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आणि राजकीय ज्योतिषी भाकितासाठी पुढे सरसावले.उमेश परिचारक हे राष्ट्रवादीत जाणार या चर्चेला ऊत आला,अजून भूकंपाचा पहिला अंदाज खरा ठरला नसताना दुसरा अंदाज वर्तविला गेला.मात्र आज तरी ”किंगमेकर” अशी ओळख असलेले उमेश परिचारक राजकीय हे राजकीय चर्चेचा विरंगुळा म्हणून आस्वाद घेत असावेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.   

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

14 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago