आता सरगम चौक ते वाखरी रस्त्याचे होणार दुभाजकासह फोर लेन काँक्रीटीकरण

केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री ना.नितीन गडकरी हे गडकरी ऐवजी रोडकरी नावाने प्रसिद्ध झाले ते केवळ त्यांनी देशभरात रस्ते आणि महामार्ग बांधणीच्या कामाला दिलेली गती,विविध रस्त्यांच्या कामाला दिलेली मंजुरी आणि त्याचे फलित म्हणून आज पंढरपूर या तीर्थक्षेत्राला जोडणारे मजबूत चार पदरी कॉक्रीटचे महामार्ग हे होय.पंढरपूर महाड या रस्त्याच्या चौपदीकरणाबरोबरच कॉक्रीटीकरणाचा निर्णय महायुतीच्या सत्ता काळात झाला तेव्हा पंढरपूर शहरातील तालुका पोलीस ठाणे ते प्रबोधनकार ठाकरे चौक या रस्त्याच्या कामासाठी तत्कालीन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आग्रह धरून आ.प्रशांत परिचारक यांनी मंजुरी घेतली व निधीही उपलब्ध झाला.सुरवातीला या रस्त्याचे काम तीन पदरी प्रस्तावित होते पण आ.परिचारक यांनी पाठपुरावा करून या रस्त्याचे सुरु असलेले काम थांबवून हा रस्ता चौपदीकरण करण्यास मंजुरी आणली.पुढे तुळशी वृंदावनाच्या उदघाटन सोहळ्यात त्यांनी तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्यासमोर प्रबोधनकार ठाकरे चौक ते क्रांतीसिह नानासाहेब पाटील चौक या लिंकरोडच्या चौपदरीकरणासह कॉक्रीटीकरण करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आणि या रस्त्यासाठी ६ कोटी रुपयांचा निधीही जागेवरच मंजूर करण्याची घोषणा तत्कालीन अर्थमंत्रीसुधीर मुनगुंटीवार यांनी केली होती.     

 पंढरपूर शहरातील सरगम चौक ते क्रांतीसिह नाना पाटील चौक हा रस्ता अतिशय वर्दळीचा व अपघात प्रवण समजला जातो.या या रस्त्यावर किमान दुभाजक तरी केले जावेत अशी मागणी सातत्याने होत आली आहे.सध्या आळंदी-मोहोळ या पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाचे व कॉक्रीटीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे व जून अखेर पर्यंत हे काम पूर्णत्वास जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.     

आमदार प्रशांत परिचारक यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन वाखरी पर्यंत प्रस्तावित असलेला हा मार्ग पंढरपूर शहरास सरगम चौकापर्यंत जोडण्यात यावा.अन्य महामार्गाप्रमाणे या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे,कॉक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात यावे व प्रशस्त दुभाजक करण्यात यावा अशी मागणी केली आहे.या मागणीस ना. गडकरी यांनी हिरवा कंदील दाखविल्यास पंढरपूरकरांचा मोठा जिव्हळ्याचा प्रश्न सुटणार आहे.

त्याच बरोबर महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय महामार्ग ५४८-ई म्हसवड-पिलीव-भाळवणी-पंढरपूर या रस्त्यावरील भाळवणी गावातील रस्ता पिलीव प्रमाणे ६५ फूट (चौपदरी रस्ता) करावा अशीही मागणी आ.प्रशांत परिचारक यांनी ना.गडकरी यांच्याकडे केल्याचे समजते. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago