गुन्हे विश्व

ग्राहक बनून आला अन् सोन्याचा बॉक्स घेऊन पसार झाला…

मुंबई: कांदीवली परिसरातील एका सराफाच्या दुकानात चोरीची घटना घडली आहे. एक व्यक्ती सराफाच्या दुकानात ग्राहक बनून आला आणि सोन्याचा बॉक्स घेऊन फरार झाल्याचा प्रकार घडलाय. या प्रकरणी कांदीवलीतील चारकोप पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस या चोराचा तपास घेत आहेत.

 

कांदीवलीच्या चारकोप परिसरातील भारत भूषण इमारतीतील पद्मावती ज्वेलर्समध्ये एक व्यक्ती ग्राहक बनून आला. त्याने दुकानदाराला सोन्याचे पेन्डंट दाखवायला सांगितले. तो दुकानदार त्या व्यक्तीला पेन्डंट दाखवत होता त्याचवेळी त्या व्यक्तीने दुकानातील पेन्डंटची बॅग घेतली आणि तो पळाला. या घटनेची तक्रार चारकोप पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून तसा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.चोरीची ही घटना 4 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. घटना घडली तेव्हा दुकान मालक चेतन खिचा हे दुकानात एकटेच होते. ती वेळ साधून चोराने आपल्याला मंगळसूत्रासाठी काही पेन्डंट पाहिजे असे सांगितलं. त्यावेळी दुकानदाराने त्याला काही डिजाइन्स दाखवले. चोराने आपल्याला आणखी काही डिजाइन्स पहायचे असे सांगितल्यानंतर मालक दुसऱ्या बाजूला वळाला. तीच संधी चोराने साधली आणि तो पेन्डंट असलेली बॅग घेऊन पळाला.

 

या बॅगमध्ये 2.5 लाख रुपये किंमतीचे 18 पेन्डंट होते. मालकाने चोराचा पाठलाग केला पण चोर आपल्या साथीदारासह एका बाईकवरुन पसार झाला. चारकोप पोलिसांनी आयपीसी कलम 380 आणि कलम 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळीच्या सीसीटीव्हीमध्ये ही चोरी कैद झाली असून त्या आधारे पोलिसांनी चोरट्याच्या शोधाला सुरुवात केली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

12 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

6 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago