ताज्याघडामोडी

सहकार शिरोमणी कारखाना कार्यस्थळावरील किर्तन सोहळ्याची काल्याच्या किर्तनाने सांगता

चंद्रभागानगर (दि.०९)ः- सहकार शिरोमणी वसंतराव (दादा) काळे यांच्या १९ व्या पुण्यतिथी निमित्त सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.साखर कारखाना कार्यस्थळावर कल्याणराव काळे बहुउद्देशिय समाजसेवी संस्थेमार्फ़त आयोजित करण्यात आलेल्या किर्तन सोहळ्याची सांगता मळोली (ता.माळशिरस) येथील गुरुवर्य ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर यंाच्या काल्याच्या किर्तनाने झाली. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन मा.श्री.कल्याणराव काळे, व्हा.चेअरमन मा.श्री.राजेंद्र शिंदे उपस्थित होते. प्रारंभी संस्थापक चेअरमन स्व.वसंतराव (दादा) काळे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे पुजन करण्यात आले.
काल्याच्या किर्तनामध्ये, ‘‘ एकमेका देऊ मुखी, सुखी घालु हुंबरी… ‘‘ जगतगुरु तुकोबारायांच्या या अभंगाचे निरुपण करताना ह.भ.प.बापूसाहेब महाराज देहूकर यांनी गोकुळातील श्रीकृष्ण लिलांचे वर्णन करताना सहकाराची कल्पना श्रीकृष्णाने तेव्हा रुजविल्याचे सांगत प्रतिकुल परस्थितीत संस्थापक वसंतराव काळे यांनी भाळवणीच्या माळरानावर सहकार मंदिर उभारुन शेतकरी व कामगारांचा उध्दार केल्याचे सांगितले. चेअरमन कल्याणराव काळे यांनी त्यांच्या आचार-विचारांचा वारसा सक्षमपणे चालवित असल्याचेही त्यांनी नमुद केले.
सहकार शिरोमणी कारखान्याचे संस्थापक, सहकार शिरोमणी स्व.वसंतराव (दादा) काळे यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त कारखाना कार्यस्थळावर दरवर्षी धार्मिक व सामाजिक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उर्वरीत कार्यक्रमांना फ़ाटा देत  सामाजिक अंतराचे भान ठेवुन २ ़ते ९ फेब्रुवारी पर्यत केवळ किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर किर्तन सोहळ्यामध्ये प्रसिंध्द किर्तनकार ह.भ.प. मच्छिंद्र महाराज कावडे, ह.भ.प.शक्ती महाराज चव्हाण, बालकिर्तनकार ह.भ.प. भक्ती महाराज देठे, ह.भ.प.निवृत्ती महाराज नामदास, ह.भ.प. प्रदिप महाराज ढेरे, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज पवार, ह.भ.प.एकनाथ महाराज चौगुले यांनी या किर्तन सोहळ्यात किर्तन सेवा देवून उपस्थित भाविक भक्तांना आपल्या सुमधुर वाणीने मंत्रमुग्ध केले. काल्याचे किर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ा किर्तन सोहळ्याचे व्यवस्थापक म्हणुन कारखान्याचे मा.संचालक शहाजी पासले, संचालक भारत कोळेकर, व ह.भ.प.धनंजय महाराज गुरव यांनी काम पाहिले.
याप्रसंगी मा.व्हा.चेअरमन मारुती भोसले, संचालिका मालनबाई काळे, सौ.संगिताताई काळे, संचालक सर्वश्री मोहन नागटिळक, बाळासाहेब कौलगे, भारत कोळेकर, राजाराम पाटील, ऍड.तानाजी सरदार, विलास जगदाळे, सुधाकर कवडे, योगेश ताड, युवराज दगडे, इब्राहिम मुजावर, अरुण बागल, नागेश फ़ाटे, माजी संचालक शहाजी पासले, राजसिंह माने, संभाजी बागल, तानाजी जाधव, तुकाराम माने, कार्यकारी संचालक प्रदिप रणनवरे, डेप्यु.जनरल मॅनेजर कैलास कदम,कल्याणराव काळे बहुउद्देशिय समाजसेवी संस्थेचे अध्यक्ष व कारखान्याचे सिव्हिल इंजिनिअर नानासाहेब काळे, सेक्रेटरी एम.आर.मदारखान, वर्क्स मॅनेजर जी.डी.घाडगे, प्रोडक्शन मॅनेजर एन.एम. कुंभार, डिस्टीलरी मॅनेजर पोपटराव घोगरे, चिफ़ इंजिनिअर सुखदेव औताडे, शेती अधिकारी पी.जी.शिंदे, लेबर ऑफ़िसर राजकुमार जाधव, परचेस ऑफ़िसर सी.जे.कुंभार, कार्यालय अधिक्षक सी.एस.गायकवाड, कल्याणराव काळे बहुउद्देशिय समाजसेवी संस्थेचे उपाध्यक्ष व केनयार्ड सुपरवायझर डी.डी.काळे व सभासद शेतकरी, विविध विभागातील खातेप्रमुख व कर्मचारी, परिसरातील भाविक मोठ्या संखयेने उपस्थित होते.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

1 week ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago