गुन्हे विश्व

धक्कादायक! अधिकृत सेंटरमधूनच दिले जात होते बोगस आधारकार्ड

भारतीय नागरिक असल्याचा पुरावा म्हणून अनेक ओळखपत्रांपैकी एक असलेले आधारकार्ड अधिकृत सेंटरमधूनच बोगस दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने याप्रकरणी दोघांना अटक केली असून, नेपाळच्या नागरिकासह अनेकांना या दोघांनी बोगस कागदपत्रांवर आधारकार्ड बनवून दिल्याचे समोर आले आहे.

बोरिवली पश्चिमेकडील कॅनरा बँकेत आधारकार्ड नोंदणीची सेवा पुरविणाऱ्या कंपनीने त्यांचे अधिकृत सेंटर सुरू केले आहे. बँकेचे अधिकारी केवायसी अपडेटसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या कागदपत्रांची पडताळणी करून आधारकार्डसाठी या सेंटरवर पाठवतात. त्यानंतर या सेंटरमधील ऑपरेटर कागदपत्रे स्कॅन करून, ग्राहकाचे फिंगरप्रिंट, डोळे स्कॅन करून फोटो व इतर कागदपत्र अपलोड करतात. यासाठी १०० रुपये शुल्क घेतले जात असून त्याची पावती दिली जाते आणि आधारकार्ड घरच्या पत्त्यावर येते. ही नोंदणीची प्रक्रिया असताना येथील ऑपरेटर परस्पर बोगस कागदपत्रांवर आधारकार्ड तयार करून देत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ११ च्या पथकाला मिळाली. प्रभारी पोलिस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रईस शेख. सहायक निरीक्षक भरत घोणे, विशाल पाटील यांच्यासह रवींद्र भांबीड, दीपक कांबळे, अजय कदम, रिया अणेराव याच्या पथकाने या सेंटरवर छापा टाकला. पोलिसांनी विनोद चव्हाण आणि उमेश चौधरी या दोघांना अटक केली

कुणाची कागदपत्रे कमी असल्यास किंवा कुटुंबातील लहान मुलाचे आधारकार्ड काढायचे असल्यास परिचयातील व्यक्तीची कागदपत्र देण्याची तरतूद आहे. या सेंटरमध्ये परिचयातील व्यक्ती म्हणून कुणाचीही कागदपत्रे जोडून कुणालाही आधारकार्ड मिळवून दिले जात होते. एका आधारकार्डमागे हे दोघे चार ते पाच हजार रुपये घेत होते. अनेकांना तर पैसे देऊनही आधारकार्ड मिळाली नसल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले. दोन्ही आरोपींना न्यायालयाने ९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

46 mins ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

6 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago