ताज्याघडामोडी

10 रुपये मागितले आणि डॉक्टर मॅडमचे मंगळसूत्रच पळवले!

बीड, 01 फेब्रुवारी : डोक्यावर लांब केस, चमचमीत साडी परिधान करून युवक अचानक समोर आला आणि महिला डॉक्टरच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळाला. परंतु, वेळीच डॉक्टरचे सतर्कता दाखवल्याने अवघ्या दहा मिनिटात या चोराला पकडण्यात आले ही घटना बीड (Beed) शहरातील काकू नाना हॉस्पिटलमध्ये (Kaku Nana Hospital beed) भर दुपारी चार वाजता घडली.

मोहिनी जाधव असं डॉक्टरचे नाव आहे. त्या जिल्हा रुग्णालयात कर्तव्य आहेत. परंतु, त्यामुळे सध्या जिल्हा रुग्णालयात लहान मुलांचा विभाग काकू नाना हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आला आहे. दुसऱ्या मजल्यावर मोहिनी जाधव यांना चोरट्याने महिलेच्या वेशात पैसे मागितले असता त्यांनी दहा रुपये काढून दिले. परंतु, त्यांनी तात्काळ त्यांच्या मंगळसूत्रावर डल्ला मारून पळ काढला.

मोहिनी जाधव यांनी आरडाओरड सुरू केली आणि काही लोकांनी लगेच त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी बीड शहरांतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. महिलांचा वेष परिधान करून चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याचं पोलिसांकडून अंदाज व्यक्त केला जात आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

6 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago