ताज्याघडामोडी

दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ बाँबस्फोट स्फोट

कृषि विधेयकांविरोधातील शेतकरी आंदोलनाने गजबजून गेलेली राजधानी दिल्ली शुक्रवारी सायंकाळी स्फोटाने हादरली आहे. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा स्फोट दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ झाल्याचे वृत्त आहे. इस्रायली दूतावासापासून जवळपास १५० मीटर अंतरावर हा स्फोट झाला. घटनास्थळी स्पेशल सेल दाखल झाले असून या स्फोटामुळे काही गाड्यांचे नुकसान झालेल्याची प्राथमिक माहिती असली तरी या घटनेत कोणत्याही प्रकारे जीवितहानी झालेली नाही किंवा कुणीही जखमी झालेले नाही. शेती पूरक व्यवसायातून पैसे कमविण्याचे ६ मार्ग हा स्फोट जिंदल हाऊसच्या बाहेर असलेल्या झुडुपांत आढळलेल्या एका पिशवीत असलेल्या स्फोटकांमुळे झाल्याचे समजते. हा स्फोट ‘आयईडी’च्या माध्यमातून घडवून आणण्यात आल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे. हा भाग संवेदनशील समजला जातो. या परिसरात ब्राझीलचे दूतावासही आहे. या भागात नेहमीच कडक सुरक्षा व्यवस्था तैनात असते स्फोट झालेल्या परिसरापासून काहीच किलोमीटर अंतरावर ‘बिटिंग द रिट्रीट’ सोहळा सुरू असून हो स्फोट कमी तीव्रतेचा असल्याचे वृत्त आहे. इस्रायली दूतावासाच्या बाहेर उभ्या असलेल्या अनेक गाड्यांच्या काचा स्फोटामुळे फुटल्याचीही माहिती समोर येत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

6 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago