पनवेल, 24 जानेवारी : खारघर गोळीबारातील चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. कोपरा गावातील सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपींपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. या आरोपींच्या अटकेनंतर एक धक्कादायक खुलासा झाला आहे.
हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी हे आरोपी लूटमार करत असल्याचं पोलीस तपास स्पष्ट झालं आहे. विपीन ठाकूर, गोपाल सिंह, अभिनंदन शर्मा, मुचन ठाकूर अशी आरोपींची नावे आहेत. 24 तासांमध्ये हे चारही आरोपी गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं.
23 जानेवारी रोजी प्रतीक रवींद्र आहेर 24 वर्षे इस्टेट एजंट रा.पेण शहर जि रायगड हा पेण येथून 3 वाजताच्या दरम्यान वाशी येथे त्याच्या दुचाकीने फिरण्यासाठी आलेला होता. त्यानंतर तो रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान कोपरा गाव बस स्टॉपच्या मागील रोडने आतमध्ये गेला आणि सिगरेट घेऊन ते पीत होता. त्याचवेळी तिथं तीन अनोळखी इसम त्याच्याकडे मोबाईल, पैसे व दुचाकीची चावी मागू लागल्याने ते देण्यास नकार त्याने नकार दिला.
प्रतीकने आपल्याकडील वस्तू देण्यास नकार देताच अनोळखी इसमांपैकी एक जण जबरदस्तीने मोबाईल ओढू लागला. त्याला विरोध केल्याने प्रतीक आहेर याच्या डाव्या पायाच्या मांडीवर शस्त्रातून एक गोळी फायर करून ते तिघेही पळून गेले. जखमीस पायामध्ये गोळी लागल्याने त्या परिसरातून जाणाऱ्या एका इसमाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यास पुढील उपचारसाठी एमजीएम कामोठे हॉस्पिटल येथे दाखल केले.
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…