ताज्याघडामोडी

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

राज्य सरकारने नववर्षाच्या सुरुवातीला आपल्या कर्मचा-यांना एक मोठे गिफ्ट दिले आहे. राज्य सरकारने सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ केली आहे. राज्य सरकारने ही मोठी घोषणा नववर्षाचा पहिला सण मकर संक्रांतीच्या निमित्ताने केली आहे. या गोड बातमीने वर्षाची सुरुवात झाल्याने यंदाचे वर्ष सरकारी कर्मचा-यांसाठी आनंद घेऊन आल्याचे या निमित्ताने दिसत आहे. महाभाई भत्त्यात राज्य सरकारने केलेल्या 3% वाढीमुळे महागाई भत्ता 9 टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, वाढीव 3 टक्के महागाई भत्ता 1 जानेवारी 2019 ते 30 जून 2019 या कालावधीसाठी मिळणार आहे. जानेवारी 2021च्या पगारात जानेवारी 2019 ते जून 2019 या सहा महिन्यांची वाढीव महागाई भत्त्याची रक्कम जोडली जाणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार घसघसीत मिळणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

याबाबतची घोषणा डिसेंबर 2020 महिन्यात करण्यात आली होती. ज्यानुसार, सातव्या वेतन आयोगानुसार त्यांच्या पगारात आणि डीएमध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. ही घोषणा आता सत्यात अवतरली असून लवकरच याचा लाभ सर्व सरकारी कर्मचा-यांना मिळणार आहे.

दरम्यान दिल्ली सरकारने अकुशल श्रमिकांसाठी 15,492 रुपये, अर्धकुशल साठी 17,069 रुपये आणि कुशल कर्मचा-यांसाठी 18,797 रुपये असा पगार निर्धारित करण्यात आला आहे. तसेच लिपिक आणि पर्यवेक्षी कर्मचा-यांच्या पगारात देखील वाढ करण्यात आली आहे. यात गैर-मॅट्रिक्युलेशन ला महिना पगार 17,069 रुपये मिळणार आहे. तर मॅट्रिक पास पण गैर स्नातक यांना मासिक वेतन 18,797 रुपये मिळेल. तर स्नातक आणि त्यावर पदावर असलेल्यांना मासिक वेतन 20,430 रुपये मिळेल.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

5 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago