ताज्याघडामोडी

कोविड लसीकरणासाठी प्रशासन सज्ज-प्रांताधिकारी-सचिन ढोले

पहिल्या टप्प्यातील लसीकरण दिनांक 16 जानेवारी 2021 रोजी उपजिल्हा रुग्णालय येथील संसर्गजन्य रुग्णालय येथे करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने व आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली असून, कोविड लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

पहिल्या टप्प्यात 1610 डोज उपलब्ध झाले असून, तालुक्यातील डॉक्टर्स व आरोग्य सेवा देणाऱ्या संबंधित कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे. यासाठी कोविन ॲपवर यादी संकलित करण्यात आली आहे. संबधित लाभार्थ्याल नोंदणी केलेल्या मोबईलवर लसीकरणाबाबत संदेश प्राप्त होणार आहे. आरोग्य विभागाने लसीकरणाच्या ठिकाणी लसीकरण कक्ष, निरिक्षण कक्ष तसेच ॲब्युलन्स सेवा सुसज्ज ठेवण्याबाबत दक्षता घ्यावी तसेच आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध ठेवाव्यात अशा सूचनाही श्री.ढोले यांनी यावेळी दिल्या. 

उपजिल्हा रुग्णालय रुग्णालय पंढरपूर येथील संसर्गजन्य रुग्णालय पंढरपूर येथे 16 जानेवारीला लसीकरण करण्यात येणार असून, यासाठी लसीकरणाची सर्व तयारी आरोग्य विभागाने केली असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम यांनी दिली. लसीकरण कक्षाचे उदघाटन प्रातांधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते होणार आहे

 आरोग्य सेवेशी संबंधित 100 जणांना लस देण्यात येणार आहे. यासाठी कोविन ॲपवर यादी संकलित करण्यात आली आहे . लस देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांला रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक दिवस अगोदर वेळ व ठिकाणची माहिती देणारा संदेश येणार आहे. यासाठी संबधितांनी नोंदणी करताना जे ओळखपत्र जोडले आहे ते घेवन यावे. लाभार्थी लसीकरण कक्षात आल्यानंतर त्यांची माहिती घेतल्यानंतरच त्याना लसीकरण केले जाणार आहे. लसीकरण केल्यानंतर संबधितांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली अर्धा तास निरिक्षण कक्षात ठेवण्यात येणार आहे. यानंतर त्यांना घरी पाठविण्यात येणार असल्याचेही डॉ.गिराम यांनी सांगितले.  

कोविड लस ही 2 ते 8 डिग्री सेल्सीअस तापमाणात लस ठेवावी लागत असल्याने सुसज्ज अशी रेफ्रीजेटरची व्यवस्था उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे करण्यात आली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकरी डॉ.बोधले यांनी दिली. लाभार्थ्यांना लस सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 यावेळत देण्यात येणार आहे.लाभार्थी लसीकरण करुन घरी आल्यानंतरही त्यांना काही त्रास झाला तर यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने समिती स्थापन करण्यात आली असून, यामध्ये शासकीय व खाजगी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.संबधितावर तज्ज्ञ डॉकटरांकडून तात्काळ उपचार केले जाणार आहेत याबाबत कोणतीही भीती अथवा गैरसमज बाळगू नये असे आवाहनही डॉ.बोधले यांनी केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

18 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

6 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago