ताज्याघडामोडी

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज तहसिलदार – विवेक सांळुखे

पंढरपूर, दि. 14:- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये माहे एप्रिल  ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. पंढरपूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतीसाठी  331 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीसाठी दि.15 जानेवारीला सार्वत्रिक मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी  1 हजार 736 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले  असून, निवडणुक अधिकारी, कर्मचारी संबंधित मतदान केंद्रावर रवाना झाले असल्याची माहिती प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार विवेक सांळुखे यांनी दिली.

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020-21 साठी  तालुक्यात 72 ग्रामपंचायतीची पैकी जैनवाडी ग्रामपंचायतीसह 17 मतदान केंद्रांतील 15 प्रभागामधील  100 उमेदवार बिनविरोध झाले आहेत.  निवडणुकीसाठी 1 हजार 657 उमेदवार निवडणुक लढविणार असून  ग्रामपंचायत निवडणुकीसाठी  1 लाख 4 हजार 416  पुरुष मतदार व 92 हजार 18 स्त्री मतदार तसेच इतर 01 असे एकूण 1 लाख 96 हजार 435 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.  नियुक्त निवडणूक अधिकारी कर्मचारी शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथून गुरुवारी दिनांक 14 रोजी  मतदान साहित्य घेवून रवाना झाले आहेत. कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी  30 एस.टी.बसेस व 27 जीपची व्यवस्था करण्यात आली होती. 

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी तालुक्यातील सहा गावे अतिसंवेदनशील असून त्यामध्ये नारायण चिचोंली, कासेगांव, खर्डी, अजनसोंड, गोपाळपूर व त.शेटफळ  तसेच गादेगांव, वाखरी, भंडीशेगांव, भाळवणी, धोंडेवाडी, उपरी, पिराची कुरोली, सोनके, तिसंगी, रोपळे, चळे, रांझणी आणि खरसोळी 13 गावे संवेदनशील आहेत. यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कोरोना संसर्गाच्या कालावधीत मतदान होत असल्याने मतदान केंद्रावर आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असल्याचेही प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार सांळुखे यांनी सांगितले.

ग्रामपंचायती निवडणुका ह्या ग्रामपातळीवर संवेदनशील असतात. निवडणुका शांततेत पार पाडव्यात यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली. तसेच मतदारांनी निर्भिड व निपक्षपणे मतदान करावे असे आवाहनही श्री.कदम यांनी यावेळी केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

2 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 week ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago