ताज्याघडामोडी

ना.धनंजय मुंडे राजीनामा देण्याच्या तयारीत ?

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे राजीनामा देण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी देखील मुंडे यांच्यावरील आरोर हे गंभीर स्वरुपाचे असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राजीनामा देण्याची शक्यता वाढली आहे. सर्व सदस्यांची मते जाणून घेतल्यानंतर याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊ. पक्ष आणि पक्षप्रमुख म्हणून निर्णय घेणार. कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे पक्ष कार्यालयात येऊन राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु आहे. मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपामुळे त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. याआधी धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. आज संध्याकाळपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल अशी चर्चा आहे.मी शरद पवारांना भेटून याआधी सगळी माहिती दिली आहे. मी माझं व्यक्तीगत म्हणणं सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे नेतृत्व करणारे नेते निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी कार्यालयात आल्यावर दिली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार आरोप करण्यात आला आहे. या नंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. धनंजय मुंडे यांनी यानंतर केलेल्या या पोस्टनंतर हा विषय आणखी चर्चेत आला. भाजपने या आरोपामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

3 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago