पंढरपूर, दि. 12:- जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव मंगळवार दिनांक 19 जानेवारी 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, मंगळवेढा येथे आयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर येथे अवैध वाळू वाहतुक व साठ्यावर केलेल्या कारवाईत सन 2018-19 मध्ये संयुक्त वाळू ठेक्याच्या लिलावामधील शिल्लक असलेल्या सुमारे 4 हजार 644.84 ब्रास वाळू साठा जप्त केला असून, हा वाळू साठा मौजे सिध्दापूर ता.मंगळवेढा येथे ठेवण्यात आला आहे. या ठिकाणच्या वाळू साठ्याची किंमत सुमारे एक कोटी 71 लाख 85 हजार 908 रुपये इतकी आहे. ज्या कोणास वाळू लिलावात भाग घ्यावावयाचा अशा व्यक्तींनी संबधीत ठिकाणच्या वाळू साठ्याची पाहणी करावी. तसेच लिलावात भाग घेण्यासाठी सोमवार दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत लेखी अर्ज उपविभागीय अधिकारी मंगळवेढा, उपविभाग विभाग मंगळवेढा यांच्याकडे सादर करावेत, असेही उपविभागीय अधिकारी भोसले यांनी सांगितले.
सदर लिलावात भाग घेण्यासाठी 25 टक्के रक्कम रोख अथवा डी.डी.व्दारे भरावी त्याचबरोबर अर्जाचे शुल्क रुपये 2 हजार विनापरतावा भरणे आवश्यक आहे. तसेच सर्वोत्तम बोलीची 25 टक्के रक्कम तात्काळ त्याच दिवशी शासकीय खजिन्यात चलनाव्दारे जमा करावी.बोलीची उर्वरीत 75 टक्के रक्कम शासकीय खजिन्यात 7 दिवसांच्या आत भरल्यानंतर स्वत:कडील वाहनाव्दारे संबधीत ठिकाणावरुन वाळू घेवून जावी. लिलावात भाग घेण्या-या व्यक्तींनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत तसेच नमुद ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहनही उपविभागीय अधिकारी श्री. भोसले यांनी केले आहे.
अॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…