ताज्याघडामोडी

निवडणूकीचे कामकाज जबाबदारीने पार पाडा

पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 348 मतदान केंद्र होते त्यापैकी एकूण 17 वार्ड बिनविरोध झाल्याने 331 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीसाठी दि.15 जानेवारीला सार्वत्रिक मतदान घेतले जाणार असून, ग्रामपंचायत निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व मतदान प्रक्रिया जबाबदारीने पार पाडाव्यात अशा सूचना तहसिलदार तथा निवडणूक प्रधिकृत अधिकारी विवेक सांळुखे यांनी दिल्या.  

पंढरपूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवीन शासकीय धान्य गोदाम, अनवली ता.पंढरपूर येथे नियुक्त 1 हजार 736 अधिकारी व कर्मचाऱ्यांची यांना आज दुसरे प्रशिक्षण दोन सत्रात देण्यात आले. यावेळी निवडणूक नायब तहसिलदार एस.पी. तिटकारे,महसूल सहाय्यक एस.आर.कोळी,यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

निवडणूक नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया कशी पार पाडावी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर आलेल्या समस्यांचे निराकरण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच टपाल मतदानासाठी मागणी केलेल्या कर्मचाऱ्यांना जवळपासच्या गावात नियुक्त केले जाणार असून, त्या अनुषंगाने योग्यती कार्यवाही करुन त्यांचे मतदान करून घेतले जाणार आहे.यासाठी संबधितांना एक तासाची मुभा देऊन त्या अनुषंगाने आवश्यकती मदत केली जाणार आहे. जेणे करुन मतदान कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार याची दक्षता घेण्यात आली असल्याचे तहसिलदार तथा निवडणूक प्रधिकृत अधिकारी सांळुखे यांनी यावेळी सांगितले.

मतदान साहित्य स्विकृतीपासून मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदान घेताना घ्यावयाची खबरदारी, विविध संवेधानिक, असंवेधानिक लिफाफे, अर्ज भरणे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट जोडणी, प्रत्यक्ष मतदान करतांना मतदान यंत्रात बिघाड झाल्यास तात्काळ करण्यात येणाऱ्या उपाययोजना आदींबाबत माहिती निवडणूक प्रधिकृत अधिकारी सांळुखे यांनी दिली. तसेच प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. याबाबत उपस्थित शंकाचे समाधानही यावेळी करण्यात आले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

5 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 week ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

3 weeks ago