ताज्याघडामोडी

राज ठाकरे, फडणवीसांची सुरक्षा घटवली, तर पवारांनी केली ‘ही’ मागणी

मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुरक्षा कमी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून आपली सुरक्षा कमी करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर या भाजप नेत्यांसह राज ठाकरे यांच्या सुरक्षेत घट केली आहे. फडणवीस, राज ठाकरे यांच्या ताफ्यातील बुलेटप्रूफ वाहन देखील काढण्यात आलं आहे.

सुरक्षेत घट केल्यानंतर शरद पवार म्हणाले, ‘माझी सुरक्षा कमी करा. मी स्वतः माझी सुरक्षा कमी करण्यास तयार आहे. शिवाय मला देण्यात आलेल्या सुरक्षेचा आढावा घ्या आणि त्यानंतर निर्णय घ्या.’ असं पवारांनी अनिल देखमुख यांना फोनच्या माध्यमातून सांगितलं आहे. 

तीन दिवसांपूर्वी सुरक्षा आढावा समितीची बैठक पार पडली. या समितीने काही जणांची सुरक्षा कमी केली तर काही जणांची वाढवली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना  Z + सुरक्षा देण्यात आली आहे. मात्र त्यांनी राज्य सरकारला सुरक्षा कमी करण्यास सांगितलं आहे. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

7 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago