ताज्याघडामोडी

आ.प्रशांतराव परिचारक यांच्या तोंडी अस्वासनाने मिळाला भक्कम दिलासा आंबेडकर नगरमधील खोकेधारकांची धाकधूक संपली

आ.प्रशांतराव परिचारक यांच्या तोंडी अस्वासनाने मिळाला भक्कम दिलासा
आंबेडकर नगरमधील खोकेधारकांची धाकधूक संपली
पंढरपूर प्रतिनिधी
गौतम विद्यालय समोर ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर कमान व जुना गोपाळपूर नाका ते मध्य प्रदेश भवन समोरील पुल येथे सध्या अस्तित्वात असलेल्या खोकेधारकांचा व डाॅ बाबासाहेब आंबेडकर नगरातील बेरोजगारांचा प्राधान्याने विचार करुन पंढरपूर नगरपरिषद मालकीच्या जागेवरील खोक्यांची जागा कमीत कमी भाडे ठरवून मिळणे बाबत तसेच मे.सर्वसाधारण सभा ठराव क्र.66 दिनांक 18/07/2018 ने ठराव की ( अ.वि.क्र.11 ) नमूद विषयास व संदर्भास अनुसरून डाॅ बाबासाहेब आंबेडकर नगरातील समस्त खोकेधारक व बेरोजगारांकडून विनंती अर्ज आमदार प्रशांत परिचारकांना देण्यात आला, आंबेडकर नगरातील खोकेधारक गेली अनेक वर्षापासून कुटुंबासह राहत असून गौतम विद्यालय समोर व जुना गोपाळपूर नाका ते मध्य प्रदेश भवन पूल याठिकाणी लहानसहान व्यवसाय करुन उदरनिर्वाह करीत आहोत, त्या व्यवसायावर आमचे पोट अवलंबून आहे. आमच्या उपजीविकेचे एकमेव साधन तेच आहे. मात्र सदरची जागा पंढरपूर नगरपरिषदेच्या मालकीची असून त्या जागी काही दिवसांपासून मुख्याधिकारी व काही नगरसेवक सातत्याने त्या ठिकाणी येऊन मोजमाप करीत आहेत व आम्हाला आमची खोकी काढण्याच्या तोंडी सुचना देत आहेत. आम्ही विचारणा केली असता, संबंधित जागेवर पंढरपूर नगरपरिषदेच्या माध्यमातून गाळे उभे केले जाणार आहेत व ते गाळे टेंडर पद्धतीने विक्री केली जाणार आहेत, तरी तुम्ही निवीदा निघाल्यानंतर गाळे जास्तीत जास्त रक्कम भरून गाळ्यांची मागणी करु शकता. अशा स्वरूपाची उत्तरे देतात, मात्र अनेक वर्षापासून सदरच्या ठिकाणी व्यवसाय करीत आहेत. आम्ही करीत असलेल्या व्यवसायामुळे रहदारीस कोणत्याही स्वरुपाचा अडथळा निर्माण होत नाही, तसेच त्या व्यवसायामुळे सार्वजनिक आरोग्यास कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होत नाही. सदर वर नमूद नगरपरिषदेच्या जागेवर सर्व प्रकारचे कायदेशीर बाबींचे पालन करत आहोत. सदर जागेवर नगरपरिषदेचे अथवा कोणत्याही समुचित प्राधिकरणाचे आरक्षण नाही. तरी आपल्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर नगरपरिषदेने पंढरपूर शहरातील स्थानिक बेरोजगारांना व खोकेधारकांसाठी दिनांक 18/07/2018 रोजी मे.सर्वसाधारण सभा ठराव क्र.66 ( अ.वि.क्र-11 ) नुसार डाॅ बाबासाहेब आंबेडकर नगरातील सध्या अस्तित्वात असलेल्या खोकेधारकांना व बेरोजगारांना गौतम विद्यालयासमोर व जुना गोपाळपूर नाका ते मध्य प्रदेश भवन समोरील पुल ठिकाणावर लिलाव पद्धतीने गाळे वाटपाचा अवलंब न करता स्थानिक खोकेधारक व बेरोजगारांना कमीतकमी भाडे व डिपॉझिट ठरवून देण्यात यावे, अशा स्वरुपाचा विनंती अर्ज देण्यात आला व खोकेधारकांनी आपली कैफियत आमदार प्रशांत परिचारकांसमोर व्यक्त केली. आमदार परिचारकांनी आंबेडकर नगरातील खोकेधारकांना अस्तित्वात असलेल्या जागेवर कमीत कमी डिपॉझिट व भाडे ठरवून प्राधान्यक्रमाने गाळे वाटप करण्यात येतील, असे तोंडी आश्वासन देण्यात आले. यावेळी शाहु सर्वगोड, सतिश सर्वगोड,प्रशांत पवार,महेश कांबळे, अखिल बागवान,कल्पना अष्टूळ, सूवर्णा कसबे,जया साठे,गोदावरी रेनापूरे,शकीला बागवान, जुल्फिना बागवान, रेश्मा शेख, अनुराधा कसबे,संगीता माने,वनिता राऊत,सुलोचना सातपुते, लता धनवडे,छाया डोळस,सिमा बिराजदार, देवीदास बाबर,आकाश सर्वगोड, अजय चव्हाण, उमा राऊत,लखन सोनवणे,सीताराम वाघमारे,सोमा राऊत, अमिर बागवान, आकाश गुरसाळकर,समिर बागवान, गणेश राऊत, आंबे इत्यादी उपस्थित होते.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

21 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago