ताज्याघडामोडी

७ जानेवारी पासून प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या पहिल्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला  सुरवात तीन दिवस चालणार प्रक्रिया

७ जानेवारी पासून प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या पहिल्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला  सुरवात

तीन दिवस चालणार प्रक्रिया

 

पंढरपूरः प्रथम वर्षथेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी) प्रवेशासाठी येत्या गुरुवारदि.७ जानेवारी २०२१ पासून तर पदव्युत्तर पदवी असलेल्या एम.टेक.प्रवेशासाठी येत्या बुधवारदि. ०६ जानेवारी २०२१ पासून ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला  सुरवात होत असून यासाठी तीन दिवसांचा कालावधी असणार आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक महाविद्यालयांची नावे भरायची असतात. यासाठी संबंधित महाविद्यालयातील प्लेसमेंटवार्षिक परीक्षेचा निकालप्रत्येक वर्षीचे प्रवेशउच्च शिक्षित प्राध्यापक वर्गसोयी सुविधाइन्फ्रास्ट्रक्चर या बाबी प्रामुख्याने आवर्जून पहाव्यात मगच महाविद्यालय निवडावे.  त्याचबरोबर आपला पासवर्ड कोणालाही देवू नये.’ असे आवाहन  स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले आहे.

            शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता अभियांत्रिकी प्रवेशासाठी कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाली असून आता कॅप राऊंड सुरु होतील. यासाठी महाराष्ट्र राज्य केंद्रीय प्रवेश प्रक्रिया विभागाने कॅप राऊंडच्या तारखा निश्चित केल्या असून प्रथम वर्ष पदवी  अभियांत्रिकी (बी.इ./ बी. टेक.) व थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (कॅप राऊंड-१) येत्या गुरुवारदि.०७ जानेवारी २०२१ पासून ते शनिवारदि. ०९ जानेवारी २०२१ पर्यंततर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम असलेल्या एम.ई./ एम.टेक.च्या प्रवेशासाठी बुधवारदि.०६ जानेवारी २०२१ पासून ते शुक्रवारदि. ८ जानेवारी २०२१ पर्यंत प्रक्रिया चालतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेल्या या प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होत असून स्वेरी अभियांत्रिकीमध्ये सॅनिटायझेशन व सोशल डिस्टनसिंग पाळून ऑप्शन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणेस्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करणे आदी बाबींचा समावेश होता त्यानंतर आताच्या टप्प्यात कॉलेज निवडीसाठी ऑप्शन फॉर्म्स भरायचे आहेत. स्वेरी महाविद्यालयापासून दूर अंतरावर असलेल्या विद्यार्थ्यांना मोहोळमंगळवेढासांगोलामाढाकुर्डुवाडीकरकंब या ठिकाणी मोफत ऑप्शन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. तसेच स्वेरी अभियांत्रिकीचा इन्स्टिट्यूट चॉईस कोड EN-६२२० हा आहे याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी मोहोळ (डी.टी.काशीद- ९१६८६५५३३५एन.एस. शेख-९७६४७९३१८६)मंगळवेढा (पी. बी. आसबे -७८२१००४६४७आर.डी.सोळगे-९७६६९९०२७४)सांगोला (के.बी.जुंधळे-९३७०३४४९८०एस.डी.कदम-८९९०३७३५५)करकंब (एन.एस.आदमिले-९३२३५९०१६०एस.डी.भिंगारे- ९८९०२३६७०९)कुर्डुवाडी (एच.एम. तांबोळी -८३८००९०२६०एस.सी. हलकुडे -९८५०२४२१५५) आणि माढा (ए.के. पारखे-९५०३६३२६२२आर.एस. साठे-७७०९९४१४८२) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी (९८६०१६०४३१)स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार (९५४५५५३८८८)प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे (९५४५५५३८७८)प्रा. मनोज देशमुख (९९७०२७७१५०)प्रा. उत्तम अनुसे (९१६८६५५३६५) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

2 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 week ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago