ताज्याघडामोडी

प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी, एम.टेक.,फार्मसी व एम.बी.ए.च्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ

प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी, एम.टेक.,फार्मसी व
एम.बी.ए.च्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ
पंढरपूरः ‘प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी), एम.टेक., फार्मसी (पदवी, थेट द्वितीय वर्ष व एम.फार्मसी) व एम.बी.ए (पदव्युत्तर पदवी) च्या ऑनलाईन प्रवेश प्रकियेला (कॅप) पुन्हा मुदतवाढ देण्यात आली असून आता प्रथम वर्ष अभियांत्रिकी (बी.इ./ बी. टेक.) व थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (कॅप रजिस्ट्रेशन) साठी  बुधवार दि.३० डिसेंबर २०२० पर्यंत, प्रथम वर्ष बी. फार्मसी व थेट द्वितीय वर्ष बी. फार्मसी  (डी.एस.वाय) व एम. फार्मसी साठी ३० डिसेंबर २०२० पर्यंत,  एम.ई./ एम.टेक. साठी बुधवार, दि.३० डिसेंबर २०२० पर्यंत तर एम.बी.ए. (पदव्युत्तर पदवी) साठी मंगळवार दि.२९ डिसेंबर २०२० अशा स्वरूपात विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला (कॅप रजिस्ट्रेशन) मुदतवाढ देण्यात आली आहे.’ अशी माहिती  स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
      यापूर्वी दि.०९ डिसेंबर २०२० पासून प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीची ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली होती व दि. २२ डिसेंबर ला संपली होती पण अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशाशी संबंधित कागदपत्रे व प्रमाणपत्रे उपलब्ध झाली नव्हती हे पाहून विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून व काही अपुऱ्या तांत्रिक बाबी यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेल्या या प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होत असून स्वेरी अभियांत्रिकीमध्ये सॅनिटायझेशन व सोशल डिस्टनसिंग पाळून ऑनलाईन रजिस्ट्रेशनची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर  मुदतवाढ व प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करणे आदी बाबींचा समावेश आहे. प्रवेश प्रक्रियेच्या नंतरच्या टप्प्यात प्रवेश अर्जांचे ऑनलाईन कन्फर्मेशन, अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणे, प्रथम व द्वितीय फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे आदी बाबींचा समावेश आहे. खुल्या प्रवर्गातील मराठा विद्यार्थ्यांना आता महाराष्ट्र शासनाचे ई. डब्ल्यू.एस. प्रमाणपत्र मिळत असून इच्छुक विद्यार्थी त्या सवलतीचा फायदा घेऊ शकतात. अभियांत्रिकीच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी (९८६०१६०४३१), स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार (९५४५५५३८८८), प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे (९५४५५५३८७८), प्रा. मनोज देशमुख (९९७०२७७१५०), प्रा. उत्तम अनुसे (९१६८६५५३६५) तसेच एम. बी. ए. करीता प्रा. करण पाटील (९५९५९२११५४) तर फार्मसी करिता प्रा. प्रज्ञा साळुंखे (९४०४९९१८११) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

5 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago