ताज्याघडामोडी

पंढरपूर पांचाळ सोनार समाजाच्या अध्यक्षपदी पांडुरंग महामुनी यांची निवड तर उपाध्यक्षपदी विशाल कोन्हेरीकर यांची निवड

पंढरपूर पांचाळ सोनार समाजाच्या अध्यक्षपदी पांडुरंग महामुनी यांची निवड तर उपाध्यक्षपदी विशाल कोन्हेरीकर यांची निवड 

पंढरपूर पांचाळ समाजाच्या अध्यक्षपदासहित विविध पदाधिकऱ्यांचा निवडीसाठी येथील संत नरहरी महाराज समाधी मंदिर येथे आयोजित समाज बांधवाच्या बैठकीत मतदान प्रक्रियेद्वारे निवडी करण्यात आल्या.यामध्ये अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले पांडुरंग महामुनी हे ३३ मते घेऊन विजयी झाले तर उपाध्यक्षपदी विशाल कोन्हेरीकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.     
     या निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष पांडुरंग महामुनी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत या पदाच्या माध्यमातून समाजाच्या सेवेसाठी आपण अविरत परिश्रम घेऊ अशी ग्वाही दिली.या निवडणूक प्रक्रियेसाठी गजेंद्र घोडके यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पहिले तर यावेळी गणेश पंडित,अंनत कासेगावकर,मनोज कासेगावकर,संजय वेदपाठक,केशव महामुनी,सदानंद महामुनी,रमेश पंडित,किशोर दीक्षित,स्वप्नील कमसल,सूरज क्षीरसागर,विजय कासेगावकर,सुमित पारखे,प्रशांत महामुनी,राजेंद्र कासेगावकर,बाळासाहेब महामुनी (गोडबोले) आदी उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

5 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago