ताज्याघडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून स्वेरीच्या दोन संशोधन प्रकल्पांना दिड लाख रुपयांचा  निधी मंजूर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून स्वेरीच्या दोन संशोधन प्रकल्पांना दिड लाख रुपयांचा  निधी मंजूर
पंढरपूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  सोलापूर विद्यापीठ, सोलापूर कडून ‘मायक्रो फ्लुइडिक्स’ या विषयावरील स्वेरीच्या दोन संशोधन प्रकल्पांना दिड लाख रुपयांचा  संशोधन निधी मंजूर झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली.
        येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर अंतर्गत असलेल्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट अर्थात संशोधन विभागामार्फत आणि संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रणजित गिड्डे व प्रा. दिग्विजय रोंगे यांनी अनुक्रमे ‘लो कॉस्ट पी.डी.एम.एस.बेस्ड लेन्सेस युजिंग हॅगिंग ड्रॉपलेट्स’ व ‘ऑप्टीमल डिझाईन ऑफ मायक्रो काम्पोनेन्टस फॉर मायक्रो फ्लुइडिक अॅप्लिकेशन्स’ या विषयावर आपले संशोधन प्रस्ताव सोलापूर विद्यापीठ, सोलापूर कडे सादर केले होते. सदर प्रस्तावांना ‘पिअर रिविव्ह कमिटी’ कडून शिफारस मिळालेली असून त्यांना माननीय कुलगुरू महोदयांनीही मान्यता दिलेली आहे तसेच या दोन्ही प्रकल्पांच्या संशोधन निधीबाबतची पत्रे महाविद्यालयास प्राप्त झालेली आहेत.
डॉ.रणजित गिड्डे यांचा संशोधन प्रकल्प हा विविध क्षेत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या  लेन्सेस च्या संदर्भातील आहे. स्मार्टफोन, वेब कॅम अशा उपकरणामधील प्रकाशाचे प्रदूषण थांबवणे व विजेची बचत करणे हे तसेच या व अशा इतर उपकरणांचा प्रभावी वापर करणे या संशोधनातून शक्य होणार आहे. प्रा. दिग्विजय रोंगे यांच्या संशोधन प्रकल्पाच्या माध्यमातून सूक्ष्म पातळीवर जाऊन अभ्यास करता येणारे असे मायक्रोफ्लुडीक डिव्हाइस तयार केले जाईल. अल्प कालावधीत रासायनिक संश्लेषण अचूकपणे पार पाडण्यासाठी हे डिव्हाइस कार्यशील असेल. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि मधुमेह सारख्या पॅथॉलॉजीज तसेच पॉईंट-ऑफ-केअर टेस्टिंगमध्ये या डिव्हाइसची प्रोटोटाइप फायदेशीर ठरेल. अशा योजनांतर्गत निधी मिळविणारे महाराष्ट्रातील मोजक्या महाविद्यालयांपैकी स्वेरी चे हे महाविद्यालय आहे. ‘स्वेरी’मध्ये संशोधन विभागाची स्वतंत्र निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत जवळपास साडे सात कोटी पेक्षा जास्त निधी मिळाला आहे.
संशोधन निधी बाबतच्या या यशाबद्दल डॉ. रणजित गिड्डे व प्रा. दिग्विजय रोंगे यांचे व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांचे संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

4 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago