ताज्याघडामोडी

ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेना पुर्ण ताकतीनिशी उतरणार- महावीर देशमुख

ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेना पुर्ण ताकतीनिशी उतरणार- महावीर देशमुख

पंढरपूर (प्रतिनिधी):- ग्रामपंचायत निवडणुकीचे ‘पडघम’ वाजण्यास सुरुवात झाली असुन पंढरपूर तालुक्यातील ज्या-ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत त्या सर्व ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेना पुर्ण ताकतीनिशी उतरणार असल्याची माहिती शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख महावीर देशमुख यांनी दिली. ग्रामीण भागातील तळागालातील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी निवडणुक लढवणार असल्याचेही ते म्हणाले.  

ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपलेली आहे त्या सर्व ग्रामपंचायतीची निवडणुक पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना लढणार असुन पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका आवश्यक तेथे महाआघाडीतुन व शक्य तेथे  स्वबळावर लढण्याचा निर्णय आजच्या शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. पंढरपूर तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व शिवसैनिकांची बैठक सावित्रीबाई फुले कला महाविद्यालय पंढरपूर येथे संपन्न झाली. यावेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते साईनाथभाऊ अभंगराव, जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.शैलाताई गोडसे, तालुकाप्रमुख महावीर देशमुख, शहरप्रमख रविंद्र मुळे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे, शिवसेना उपशहर प्रमुख लंकेश बुराडे विनायक वनारे, तानाजी मोरे, पोपट सावतराव, अविनाश वाळके, महिला आघाडी तालुका प्रमुख सौ. आरती बसवंती, महिला आघाडी शहर प्रमुख सौ. पुर्वा पांढरे, महिला आघाडी शहर सन्मवयक सौ. संगीता पवार, शिवसेना उपतालुका प्रमुख पवनराजे शिंदे, अर्जुन भोसले, संतोष धोत्रे, कल्याण कवडे, शिवसेना विभाग प्रमुख विलास चव्हान, उमेश काळे, विशाल गायकवाड, उत्तम कराळे, बाळासाहेब पवार, शिवसैनिक विजय करपे, युवराज गनगे, बाळासाहेब गनगे, युवासेना उपतालुका प्रमुख रणजीत कदम, दत्ता पेठकर, गणेश कदम, नागेश जाधव, माऊली मासाळ, गणेश जाधव, शुभम चव्हाण तसेच सर्व विभागप्रमुख, गटप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच पंढरपुर तालुक्यातील इतर बहुसंख्य शिवसैनिक व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

2 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 week ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago