Categories: Uncategorized

पर्यावरण व आरोग्यरक्षणासाठी, कोरोना मुक्तीचा संदेश देण्यासाठी विठ्ठल_रुक्मिणी माता ते काली माता सायकल टूर…

पर्यावरण व आरोग्यरक्षणासाठी, कोरोना मुक्तीचा संदेश देण्यासाठी विठ्ठल_रुक्मिणी माता ते काली माता सायकल टूर…
पंढरपूर(प्रतिनिधी):- संत गाडगे महाराज स्मृतीदिनी म्हणजे २० डिसेंबर रोजी पर्यावरण व आरोग्यरक्षणासाठी, कोरोना मुक्तीचा संदेश देण्यासाठी   पंढरपूर ते साहापूर म्हणजेच रुक्मिणीमाता ते कालीमाता अशा सायकल टूरचे प्रस्थान सकाळी ०९:३० वाजता होणार असल्याची माहिती सायकल मॅरेथाॅनचे आयोजक सागर कदम यांनी दिली. या सायकल टूरमध्ये एक ज्येष्ठ नागरिक दिगंबर भोसले व एक युवक  अभियंता सचिन राऊत हे सहभागी आहेत.
        याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र सायकलिंग असोशिएशन पुणे, पंढरपूर सायकल असोशिएशन , पंढरी सायकल मॅरेथाॅन यांचे संयुक्त विद्यमाने व त्यांच्या प्रेरणेने पर्यावरण व आरोग्यरक्षणासाठी, कोरोना मुक्तीचा संदेश देण्यासाठी, स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी, विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी, भौगोलिक उत्सकतेसाठी, ऋतूबदलाचा अभ्यास करण्यासाठी, एकात्मतेचा संदेश देण्यासाठी, वैविध्यतेचा अनुभव घेण्यासाठी, इंधन बचतीचे महत्व आजमावून सांगण्यासाठी, परकीय चलन वाचविण्यासाठी, संत गाडगे महाराजांच्या स्मृतीदिनी सायकल टूरचे आयोजन केले आहे. हि सायकल टूर २२०० किलोमीटरची असून २४ दिवसांची आहे. या सायकल टूरमध्ये वर्ल्ड पीस फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दिगंबर भोसले व नवयुवक इंजि. सचिन राऊत हे सहभागी होत आहेत. दिगंबर भोसले यांनी आजपर्यंत दिडलाख किलोमीटर सायकल प्रवास केला असून, ते गेली ३५ वर्षे सायकल प्रवास करित असून, विश्वशांतीचा संदेश देत असल्याची माहिती आयोजक सागर कदम, राष्ट्रवादीचे युवा नेते संदिप मांडवे, साहित्यिक राधेश बादले पाटील यांनी दिली.
                 या सायकल टूरच्या प्रस्थानास्तव पंढरपूर पंचक्रोशीतील १०० सायकलस्वारांसह विविध क्षेत्रांमधील मान्यवर हजर राहणार असून, शासकीय अधिकारी, पत्रकार आदि मान्यवरांनी तसेच पंढरपूरातील नागरिकांनी, सायकल प्रेमींनी, मायपंढरीची अस्मिता जागविण्यास्तव या कार्यक्रमाला दि.२० डिसेंबर २०२० रोजी पंढरपूर येथे छ. शिवाजी महाराज चौकात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक सागर कदम यांनी केले आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

11 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago