ताज्याघडामोडी

ग्रामपंचायतींच्या निवडणूकांसाठी काळे गटाच्या बैठका सुरु.

ग्रामपंचायतींच्या निवडणूकांसाठी काळे गटाच्या बैठका सुरु
पंढरपूर दि.14- पंढरपूर तालुक्यात होवू घातलेल्या 72 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये काळे गटाची भुमिका ठरविण्यासाठी भाळवणी येथे भाळवणी गटातील 23 गावांची बैठक पार पडली. गटनिहाय 72 ग्रामपंचायतीच्या बैठका घेणार असल्याचे कल्याणराव काळे यांनी सांगीतले.
पंढरपूर तालुक्यात 72 ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचे बिगूल वाजले आहे. तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूका पक्षीय  राजकारणापेक्षा गटा तटावरच होतात. तालुक्यात काळे,भालके,परिचारक हे तीन गट सक्षम असून,त्यांच्यामध्ये होणाऱ्या  आघाडी वरुनच निवडणुकांचे भवितव्य ठरणारे आहे. कल्याणराव काळे यांच्या ताब्यात असलेल्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील केसकरवाडी,भाळवणी,धोंडेवाडी,जौनवाडी,उपरी,शेंडगेवाडी,पिराचीकुरोली,पळशी,सुपली,वाडीकुरोली,देवडे,पटवर्धनकुरोली,गादेगांव,शेळवे,वाखरी,शिरढोण,कौठाळी,खेडभाळवणी,भंडीशेगांव,सोनके,बोहाळी,उंबरगांव,तिसंगी या गावातील काळे गटाच्या प्रमुख कार्यकत्र्यांशी गावनिहाय चर्चा करुन काळे यांनी मार्गदर्शन केले. निवडणुकांमध्ये गावपातळीवरील स्थानिक मतभेद बाजूला ठेवून,एकत्रित काम करण्याचे त्यांनी आवाहन केले.
तालुक्यात प्रत्येक गावात कल्याणराव काळे यांना मानणारा वर्ग असल्याने त्यांच्या भूमिकेवरच ग्रामपंचायतीच्या राजकारणाचे भवितव्य अवलंबुन आहे. येणाऱ्या  काळात होणाऱ्या  स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांच्या निवडणुकीत काळेगट कोणती भुमिका घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये शक्यतो विट्ठल परिवार अखंडीत ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र कार्यकत्र्यांनी स्थानिक पातळीवर आघाडी  करण्यासाठी मुभा देण्यात येणार आहे. शेवटी गावाच्या विकासाचे ध्येय धोरण ठरवुन काम करणारे कार्यकर्ते सत्तेत असणे महत्वाचे आहे. त्यामुळे कार्य कर्त्यांची मते घेण्यासाठी बैठका  सुरु आहेत.
चेअरमन,कल्याणराव काळे
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

20 hours ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 week ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago