ताज्याघडामोडी

प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु

प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु

पंढरपूरः प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी) च्या ऑनलाईन प्रवेश प्रकिया (कॅप) बुधवार दि.०९ डिसेंबर २०२० पासून सुरू झाल्या असूनया प्रक्रिया साधारणपणे जानेवारीच्या मध्यापर्यंत चालणार आहेत.‘ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.

     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेल्या या प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होणार असून स्वेरी अभियांत्रिकी मध्ये सॅनिटायझेशन व सोशल डिस्टनसिंग पाळून  ऑनलाईन रजिस्ट्रेशन ची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणेस्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करणे आदी बाबींचा समावेश आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गानुसार ऑनलाईन रजिस्ट्रेशन फी भरावी लागणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी ही फी रुपये ८०० एवढी असून इतर सर्व प्रवर्गासाठी ती रुपये ६०० एवढी आहे. सदर फी विद्यार्थी एटीएम अथवा ऑनलाईन बँकिंग च्या सहाय्याने भरू शकतात. प्रवेश प्रक्रियेच्या नंतरच्या टप्प्यात प्रवेश अर्जांचे ऑनलाईन कन्फर्मेशनअंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणेप्रथम व द्वितीय फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे आदी बाबींचा समावेश आहे. अभियांत्रिकीच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी (९८६०१६०४३१)स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार (९५४५५५३८८८)प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे (९५४५५५३८७८)व प्रा. यु. एल. अनुसे (९१६८६५५३६५) तसेच थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी) साठी प्रा.एम.ए. देशमुख (९९७०२७७१५०) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आजच्या युगात ‘आऊट ऑफ द बॉक्स’ पद्धतीने विचार करणे अनिवार्य – माजी संचालक डॉ. एन. बी. पासलकर स्वेरीमध्ये ‘ऑलम्पस २ के २४’ चा समारोप संपन्न

पंढरपूर- 'प्रत्येक विद्यार्थ्याला बाहेरच्या जगात नेमक्या काय घडामोडी सुरु आहेत याची माहिती असणे आवश्यक आहे. त्यांनी…

17 hours ago

आमदार आवताडेंनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत घेतली प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक

महिलांच्या अर्जातील त्रुटी दूर करून सर्व पात्र महिलांना लाभ देण्याच्या सूचना केंद्र व राज्य सरकारच्या…

1 day ago

राष्ट्रवादी कॉग्रेस (श.प.) पक्षाच्या अल्पसंख्यांक विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी गुलाब मुलाणी यांची निवड  खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याहस्ते निवडीचे पत्र प्रदान

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी पंढरपुर तालुक्यातील कोर्टी येथील गुलाब मुलाणी यांची…

2 days ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर जिल्हा ओबीसी विभाग कार्यकारिणी बरखास्त

नवीन कार्यकारणीसाठी मुलाखत घेऊन निवडी करणार - अरुण तोडकर  राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर…

3 days ago

‘अभियंता दिना’ निमित्त स्वेरीत रक्तदान शिबीर संपन्न राष्ट्रीय सेवा योजनेचा उपक्रम

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर (ऑटोनॉमस) व सोलापूर विद्यापीठ संलग्नित असलेल्या…

3 days ago

अभियंत्यांचे जनक -सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील चिक्कबळ्ळापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी या गावी १५ सप्टेंबर १८६०…

6 days ago