थंडीचा गारठा वाढला आणि चोरट्यांचा वावर सुरु

थंडीचा गारठा वाढला आणि चोरट्यांचा वावर सुरु

पळशी येथील चोरीच्या घटनेत दागिने,रोख रकमेसह ४ लाख १० हजारांचा ऐवज लंपास

गेल्या चार दिवसापासून पंढरपूर तालुक्यात थंडीचा गारठा वाढला असून याचाच फायदा घेत चोरटयांनी आपला हात हात दाखविण्यास सुरुवात केली आहे.थंडीचे दिवस असल्यामुळे ग्रामीण भागात रात्रीच्यावेळी वर्दळ कमी असते याचाच फायदा घेत प्रतिवर्षी याच काळात चोऱ्यांचे सत्र सुरु होत असल्याचे दिसून आले आहे.पळशी ता.पंढरपूर येथे शुक्रवार दिनांक ४ डिसेंबर रोजी रात्री ११ ते पहाटे ४ या दरम्यान झालेल्या चोरीच्या घटनेत येथील चोरटयांनी 1)आडीच तोऴ्याची सोन्याची चैन २)दोन तोळयाचे सोन्याचे मंगळसूत्र ३)दोन तोळयाचे सोन्याचे नेकलेस ४) एक तोळ्याची एक सोन्याची अंगठी ५)अर्धा तोऴयाच्या दोन सोन्याची अंगठी ६)अर्धा तोऴयाची सोन्याची बोरमाळ ७) अर्धा तोऴयाचे सोन्याचे कानातील जुबे ८) दोन ग्रँमचे सोन्याचे कानातील रिंग ९)तीन ग्रँमचे सोन्याचे बदाम १०)एक सँमसँग कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल मुद्देमाल व रोख रक्कम १० हजार असा ऐवज लंपास केला आहे.
या प्रकरणी कैलास पोपट कलागते वय 29वर्षे व्यवसाय शेती ,जात- हिंदु मराठा रा.पळशी ता पंढरपुर यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून घराच्या खिडकीतुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने उघड्या खिडकीद्वारे प्रवेश करुन घरातील लाकडी कपाटाच्या ड्रावरमधुन सोने तसेच पँन्टच्या खिशातील रोख रक्कम व एक पिशवीतील मोबाईल असे वरिलवर्णनाच्या ऐवजाची चोरी केली असल्याचे नमूद केले आहे.
याच दिवशी याच गावातील सदाशिव लोखंडे यांच्या घरीही चोरी झाली असल्याची माहिती मिळाल्याचे फिर्यादीने नमूद केले असून या चोरीचा तपास लावण्याचे मोठे आव्हान आता पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर आहे.तसेच पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीची ग्रस्त वाढवावी अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 day ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

5 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago