उंबरे येथील सत्तर पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांची मदत

उंबरे येथील सत्तर पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांची मदत
पंढरपूर- ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये तंत्रशिक्षणाचे जाळे घट्ट विणणारे शिक्षणतज्ञ डॉ.बी.पी.रोंगे सर हे आता शिक्षणाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही आपली ओळख निर्माण करत आहेत. अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे  नुकसानीच्या झळा आम्हा उंबरेच्या गावकऱ्यांना बसत आहेत. अशा वाईट काळात स्वेरीच्या डॉ. रोंगे सरांनी केलेली मदत मोलाची आहे. शिक्षणाबरोबरच सरांचे  समाजकार्य देखील लक्षवेधी ठरत आहे. ’ असे प्रतिपादन गुरसाळ्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नामदेव मुळे यांनी केले.
    नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने राज्यात थैमान घातल्याने सर्वत्र पाण्यामुळे हाहाकार उडाला होता. पुरामुळे शेतीचे व पिकांचे दृष्य विदारक दिसत आहे. अशात स्वेरीचे डॉ. रोंगे सर सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य करत आहेत. त्यांनी उंबरे (ता. पंढरपूर) येथे भेट देऊन सुमारे सत्तर पूरग्रस्त कुटुंबियांना आवश्यक अन्नधान्याचे वाटप केले. प्रास्ताविकात सुनील भिंगारे यांनी डॉ. रोंगे सरांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची ओळख करून दिली आणि उंबरे मध्ये येण्याचे प्रयोजन सांगितले. यावेळी डॉ. रोंगे म्हणाले की, ‘अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे उंबरे मधील नागरिक कठीण परिस्थितीसोबत धीराने लढत आहेत. खरंच त्यांच्या संयमाला दाद द्यावी असे वाटते, कौतुक करावेसे वाटते. आपणा सर्वांना सध्याच्या या पूर परिस्थितीला तोंड देत संकटावर मात करायची आहे त्यामुळे कोणीही धीर सोडू नये. येथील अवस्था पाहून  ‘फुल नाही तर फुलाची पाकळी’ म्हणून छोटीशी मदत करावीशी वाटली म्हणून येण्याचे प्रयोजन केले. तसेच सध्याची परिस्थती पाहता गरजू पूरग्रस्तांच्या पाल्यांना ‘कमवा व शिका’ योजनेतून स्वेरीमधील अभियांत्रिकी, फार्मसी व एम.बी.ए. या पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षण देण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल.’ असे डॉ. रोंगे यांनी सांगितले. पुरामुळे उंबरे गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या पिकांची देखील पाहणी डॉ. रोंगे सरांनी केली. या निमित्ताने उंबरे मधील सुमारे सत्तर पूरग्रस्त कुटुंबियांना जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळकर, सरपंच बाळासाहेब शिंदे, दीपक ढोबळे, हणमंत सरगर,  नितीन रोंगे, पांडुरंग नाईकनवरे यांच्यासह उंबरे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

1 week ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago