महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता

महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता

         पंढरपूर,दि.६- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाव्दार काला मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडला असून या काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता झाली आहे.

         परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात हांडी ङ्गोडण्यात आली. संत नामदेव महाराज व संत पांडुरंग महाराज हरिदास यांच्या वंशजांकडून आषाढी व कार्तिकी वारीमध्ये महाव्दार काल्याचा सोहळा साजरा करण्याची परंपरा आहे. संत पांडुरंग महाराज यांना चारशे वर्षापूर्वी प्रत्यक्ष विठुरायाने आपल्या खडावा अर्थात पादुका दिल्या होत्या अशी अख्यायिका आहे. तेव्हांपासून हा उत्सव साजरा केला जातो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात मोजक्याच भक्तांना प्रवेश देवून हा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर देवाच्या पादुका पागोट्याने बांधण्यात आल्या. यानंतर नामदास महाराज यांनी मदन महाराज यांना खांद्यावर घेवून मंदिरातील सभामंडप येथे पाच प्रदक्षिणा पूर्ण करून दहीहांडी ङ्गोडण्यात आली. यानंतर परंपरेप्रमाणे हा काला मार्गक्रमण करीत पुन्हा काल्याच्या वाड्यात दाखल झाला.

         या महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता आता झाली आहे. कोरोनामुळे यंदा आषाढीनंतर कार्तिकी यात्रा ही प्रतीकात्मक स्वरूपातच साजरी झाली आहे. दशमी व एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी होवू नये यासाठी संचारबंदी पुकारण्यात आली होती. तर २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते. कोरोनामुळे पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर १७ मार्च २०२० पासून आठ महिने बंद होते ते दिवाळी पाडव्यापासून भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. सध्या भाविकांना कोरोनाविषयक आरोग्याचे सर्व नियम पाळून श्रींचे ऑनलाइन बुकिंगनंतर मुखदर्शन देण्याची व्यवस्था समितीने केली असून याचा लाभ रोज ३ हजार भाविकांना मिळत आहे. दरम्यान मंदिर दर्शनासाठी बंद होते तेंव्हा श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे सर्व नित्योपचार व राजोपचार परंपरेप्रमाणे सुरू होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago