पदवीधरांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारा आमदार हवा कि राजकीय पक्षाची बांधिलकी मानणारा याचा निर्णय पदवीधरांना घ्यायचा आहे -डॉ.निलकंठ खंदारे

पदवीधरांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारा आमदार हवा कि राजकीय पक्षाची बांधिलकी मानणारा याचा निर्णय पदवीधरांना घ्यायचा आहे -डॉ.निलकंठ खंदारे
पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार डॉ.निलकंठ खंदारे यांच्या भूमिकेस मिळतेय पदवीधरांचे मोठे पाठबळ

 

पुणे विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी प्रतिष्ठेची केली आहे.विधानसभा निवडणुकीत ज्या प्रमाणे सामान्य अर्धशिक्षित,अशिक्षित जनता राजकीय नेते,पक्ष यांच्या खोट्या आश्वासनाला,निवडणुक सभांमधील भाषणांना बळी पडते तसेच पदवीधर मतदार संघातील डॉक्टर,वकील,शिक्षक,अगदी पदवीधर होऊनही कुठल्यातरी खाजगी आस्थापनांमध्ये कामगार कायद्याचा,राज्य विमा योजनेचा,कामगार कल्याण मंडळाच्या योजनेचा कुठलाही लाभ मिळत नसलेला पदवीधर कामगार,सुशिक्षित बेरोजगार,स्वयंरोजगार करणारा तरुण विधानसभा निवडणुकी प्रमाणे बळी पडेल असाच ठाम विश्वास वाटत असल्यामुळे हे राजकीय पक्ष नेते आज प्रचार दौरे काढत आहेत मतदार नसलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पदवीधर मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत.पण हीच वेळ आहे पदवीधर मतदारांनी आता सावध झाले पाहिजे अशीच भूमिका पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे उमेदवार डॉ.निलकंठ खंदारे यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेताना मांडली आहे.    
              पुणे विभाग पदवीधर मतदार संघात ज्यांच्याकडून मतदान करण्यात येणार आहे त्या मतदारांच्या अपेक्षा,अडचणी आणि त्यांना भेडसावणारे प्रश्न याचा उहापोह न करता केवळ राजकीय पक्षाची भूमिका हीच पदवीधरमधील पक्षीय उमेदवारांची भूमिका बनली असल्याचे दुर्दैवी चित्र दिसून येत आहे आणि यामुळेच विधानपरिषदेची मतदान करणारा पदवीधर मतदार यावेळी कधी नव्हे इतका जागृत झालेला दिसून येत आहे.कुठल्या राजकीय नेत्याची,पक्षाची भूमिका सांगू नका तुम्ही आज आम्हाला मते मागत आहात तुमचे आमच्यासाठीचे आतापर्यंतचे कार्य काय,संपर्क कधी केला होता का आणि आमच्या प्रश्नासाठी कधी पाठपुरावा केला होता का ? असा सवालही हा जागृत झालेला पदवीधर मतदार करीत असून मी गेल्या अनेक वर्षांपासून पदवीधरांच्या,विनाअनुदानित शिक्षकांच्या तसेच पदवीधर मतदार म्हणून नोंदणी केलेला असो अथवा नसो कुठलीही समस्या घेऊन आलेला व्यक्ती अथवा संस्था,संघटना असो त्यांनी मांडलेल्या समस्यांचा अभ्यासपूर्व पाठपुरावा डॉ.निलकंठ खंदारे करत आलेले आहेत त्यामुळे या मतदार संघातून त्यांना पदवीधर मतदारांचा मोठा पाठींबा मिळत असून ते विजयी होतील असा आत्मविश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

5 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago