डिसेंबर २०२१ मध्ये होणार पंढरपूर नगर पालिकेची निवडणूक

डिसेंबर २०२१ मध्ये होणार पंढरपूर नगर पालिकेची निवडणूक

वार्ड निहाय नगरसेवक निवडणूक तर नगरसेवकांमधून होणार नगराध्यक्ष निवड ?

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर आता सोलापूर जिल्ह्यातील नगर पालिका क्षेत्रातील जनतेला विशेषतः आजी आणि भावी नगरसेवकांना आता नगर पालिका निवडणुकांचे वेध लागले असून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर २०१९ मध्ये होणाऱ्या नगर पालिका व नगर पंचायतीच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार व थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याच्या फडणवीस सरकारच्या निर्णयास फाटा देत २०१९ मध्ये होणाऱ्या नगरसेवकांची निवडणूक पूर्वीप्रमाणेच छोट्या छोट्या वार्ड निहाय तर नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट जनतेतून करण्याचा अध्यादेश महाविकास आघाडी सरकारने फेब्रुवारी २०२० मध्ये काढला होता.व त्यास अर्थसंकल्पयीय अधिवेशनात विधिमंडळाची मंजुरीही घेतली होती.त्यामुळे बहुसदस्यीय व मोठ्या प्रमाणात मतदार संख्या असल्यामुळे सामान्य आर्थिक दृष्टया सक्षम नसलेल्या इच्छुकांवर अन्याय होतोय अशी भावना व्यक्त करणाऱ्या भावी नगरसेवकांना मोठा दिलासा मिळाला होता.कोरोनाचा प्रभाव ओसरत असतानाच आता राज्य निवडणूक आयोगाने प्रस्तावित नगर पालिका निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले असून यानुसार पंढरपूर नगर पालिकेची निवडणूक डिसेंबर २०२१ मध्ये अपेक्षित धरली आहे.      

                पंढरपूर नगर पालिकेवर सध्या परिचारक प्रणित पंढरपूर-मंगळवेढा विकास आघाडीची सत्ता असून २०१६ मध्ये झालेल्या नगर पालिका निवडणुकीत परिचारक गटाचे सर्वाधिक नगरसेवक विजयी झाले होते तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष नेहतराव यांचा जवळपास ४ हजार मतांनी पराभव झाला होता.मात्र नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीचे युवराज पाटील,मुकुंद देवधर,आणि परिचारकांचे कट्टर समर्थक शिवाजी कोळी यांची उमेदवारी संतोष नेहतराव यांच्या दृष्टीने अडचणीची ठरली होती.       

        २०१६ मध्ये जेव्हा नगर परिषद निवडणूक झाली होती तेव्हा राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार सत्तेत होते.आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. राज्यात राष्ट्रवादी कॉग्रेस सत्तेत शिवसेनेसोबत सहभागी आहे.विधानसभा २०१९ निवडणुकीत आमदार भारत भालके याना शहरातून मताधिक्य मिळाले होते व २०११ प्रमाणे पुन्हा नगर पालिका ताब्यात घेण्यासाठी आमदार भालके समर्थक उत्सुक आहेत.तर आमदार प्रशांत परिचारक यांच्या पाठपुराव्यामुळे फडणवीस सरकारच्या काळात पंढरपूर नगर परिषदेस मोठ्या प्रमाणात विकास कामांसाठी निधी मिळाल्यामुळे शहरातील परिचारक समर्थकही ‘विकास’ विजयी करेल या आत्मविश्वासाने तयारीत आहेत.मात्र या साऱ्या घडामोडीत अनेक विकास कामांचा निकृष्ट दर्जाबाबत मात्र सामान्य नागरिक नाराज असल्याची दखल वेळीच घेतली गेली नसल्यामुळे व राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे परिचारक समर्थकांना मात्र निवडणुकीपूर्वी अधिक सक्रिय होत जनतेच्या भावना जाणून घ्याव्या लागणार आहेत.    

                   

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

1 week ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago