आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेची नासधूस…  महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेची नासधूस

 महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी

(पंढरपूर प्रतिनिधी):- पंढरपूर शहरातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व्यायामशाळेनजीक असलेल्या डिजिटल बोर्डवरील प्रतिमा फाडून नासधूस करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची निंदणीय घटना घडली असून सदर प्रकरणातील कुप्रवृत्तींचा शोध घेऊन त्वरित गुन्हा दाखल करावा. अशी मागणी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने करण्यात आली आहे.  
     या बाबत अधिक माहिती देताना महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री उशिरा सदर प्रतिमेची विटंबना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती 8 नोव्हेंबर रोजी असून महर्षी वाल्मिकी संघाच्या  वतीने प्रतिवर्षी हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो.या उत्सवाची तयारी सुरू असतानाच सदर गंभीर प्रकार घडला असल्याने महादेव कोळी समाजबांधवात संतापाची लाट उसळली आहे.
या राज्यात आदिवासी सुरक्षित नाहीत आणि आदिवासींचे महापुरुषही सुरक्षित नाहीत हे या घटनेमुळे दिसून आले आहे. या बाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यास निवेदन देण्यात आले असून त्वरित कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. यावेळी महादेव कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

5 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 week ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

3 weeks ago