तालुक्यात संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजनेचे पाच हजार लाभार्थी

तालुक्यात संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजनेचे पाच हजार लाभार्थी

      पंढरपूर, दि. 31 :  राज्यशासना मार्फत संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योनेतंर्गत निराधार, वृध्पकाळ, अपंगत्व, विधवा, दुर्धर आजार व मानसिक आजाराने ग्रस्त नागरिकांना लाभ दिला जातो.तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे  3 हजार 145 तर श्रावणबाळ योजनेचे 1 हजार 953 असे एकूण  5 हजार 98 लाभार्थी  या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती तहसिलदार वैशाली वाघमारे यांनी  दिली.

निराधारांना आधार मिळावा यासाठी संजय गांधी व श्रावण योजना शासनाने सुरु केली आहे. संजय गांधी निराधार योजनेत 3 हजार 145  लाभार्थी लाभ घेत असून, त्यामध्ये सर्वसाधारण योजनेचे 2 हजार 724 , अनुसूचित जाती  229 व  अनुसूचित जमातीचे  192 लाभार्थी लाभ घेत आहेत. तसेच श्रावणबाळ योजनेतील 1 हजार 953  लाभार्थ्यांपैकी सर्वसाधारण योजनेचे 1 हजार 574,   अनुसूचित जाती  260 व  अनुसूचित जमातीचे  119 लाभार्थी लाभ घेत आहेत. श्रावणबाळ व संजय गांधी निराधार  योजनेच्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती योजनेच्या लाभार्थ्यांचे माहे सप्टेंबर 2020 पर्यंतचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक  खात्यावर जमा करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार वाघमारे यांनी दिली.

तसेच  श्रावणबाळ योजनेच्या सर्वसाधारण योजनेमधील 1 हजार 574 लाभार्थ्यांचे  माहे ऑगस्ट 2020 पर्यंतचे अनुदान जमा करण्यात आले आहे. तर संजय गांधी  निराधार योजनेच्या सर्वसाधारण योजनेमधील 2 हजार 724 लाभार्थ्यांचे माहे जुलै 2020 पर्यंतचे अनुदान  लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. संजय गांधी निराधार  योजनेतील सर्वसाधारण योजनेतील माहे ऑगस्ट 2020 तर श्रावणबाळ योजनेमधील  सर्वसाधारण योजनेतील माहे सप्टेंबर 2020 पासूनचे अनुदान शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचेही तहसिलदार वाघमारे यांनी सांगितले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

7 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago