महर्षी वाल्मिकी  संघाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी सुनील म्हेत्रे यांची निवड

महर्षी वाल्मिकी  संघाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी सुनील म्हेत्रे यांची निवड

पंढरपूर (प्रतिनिधी):- महर्षी वाल्मिकी  संघ या रजिस्टर्ड सामाजिक संघटनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी इसबावी, पंढरपूर येथील सुनील मारुती  म्हेत्रे यांची निवड करण्यात आली आहे. आदिवासी कोळी महादेव समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी कार्यरत असलेल्या महर्षी वाल्मिकी संघ या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशरवा यांनी  सुनील म्हेत्रे यांच्या कार्याची  दखल घेवुन त्यांची  नियुक्ती केली आहे. नुकतेच त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने आजतागायत विविध सामाजिक कार्यात आघाडी घेतलेली आहे. विशेषत: या संघटनेच्या माध्यमातुन झालेली प्रमुख कार्या पुढील प्रमाणे आहेत. पंढरपूर येथील तीन रस्ता चौक या सर्वात मोठ्या चौकास महर्षी वाल्मिकी हे नांव दिले, पंढरीतील चंद्रभागेवरील मोठया पुलाला महर्षी वाल्मिी सेतु हे नाव दिले, नगरपरिषदेकडून 28 गुंठे जागा समाज मंदिरास घेतली व या जागेस वाल्मिकी भवन हे नाव देवुन येथे आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे व्यायामशाळा ही तालीम सुरु करुन आखाडा सुरु केला. चंद्रभागेमध्ये आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांना अटक झालेली जागा शोधुन येथे  आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे स्मारक उभारणीसाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु असुन यास शासन मंजुरी  मिळाली आहे. आदिवासी विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय शिष्यवृती  सुरु होणेचे मागणीसाठी आंदोलन करुन ही शिष्यवृत्ती सुरु करुन घेतली. याचा लाभ आज हजारो आदिवासी  विद्यार्थी घेत आहेत. आषाढी वारी मध्ये मुख्यमंत्र्यांसमोर महादेव कोळी जमातीच्या दाखल्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. यास यश मिळाले असुन अनेकांना जातीचे दाखले मिळाले आहेत. सामुदायीक विवाह सोहळे, सर्व महापुरुषांच्या जयंत्या, कोरोना, महापुर आदी संकटकाळात उल्लेखनीय कार्य, कोळी महादेव जमातीच्या दाखल्याचा प्रश्‍न व नोकर्‍यांचा प्रश्‍न गेल्या 10-15 वर्षापासुन ऐरणीवर ठेवला व यासाठी वारंवार विविध प्रकारची  यशस्वी आंदोलने केली. लाखो ववारकर्‍यांचे तिर्थस्थान चंद्रभागा नदी प्रदुषण विरहीत व स्वच्छ ठेवण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. दुर्बल, वंचीत, शोषीत पिडीत, मतीमंद , निर्वासीत , बेवारस, अपंग यांचेसाठी उल्लेखणीय कार्य.महर्षी वाल्मिकी  संघाने केलेले आहे.  

अशा अनेक भरीव समााजिक कार्यात सक्रीय असलेल्या महर्षी वाल्मिकी संघाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी माझी निवड झाल्याबद्दल वरिष्ठांचे व संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. माझ्यावर सोपविलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडीन व संघटनेच्या ध्येय धोरणानुसार संघटनेच्या विविध कार्यात सक्रीयपणे सहभागी होईल. असे मत यावेळी नुतन जिल्हा उपाध्यक्ष सुनील म्हेत्रे  यांनी व्यक्त केले. यावेळी गणेश अंकुशराव, राहुल परचंडे, संदीप घंटे, निलेश माने,सुरज कांबळे, संपत सर्जे, नितेश म्हेत्रे, अक्षय म्हेत्रे्र, स्वप्नील गायकवाड, प्रज्योत देशमुख, महेश सेवान, संकेत गायकवाड, अभिजीत बेसुळके, मुबीन तांबोळी, विश्‍वजीत करपे, करण पंगुडवाले, प्रकाश मगर, आदित्य जाधव रंजीत लवटे, निखील धनवडे, गणेश जवारे, सुहास डुरे-पाटील, मुन्ना म्हेत्रे, प्रथमेश म्हेत्र आदी उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

1 week ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago