सुशिलकुमार शिंदे साहेबांच्यावतीने पुरग्रस्तांना किराणा मालाच्या किटचे वाटप

सुशिलकुमार शिंदे साहेबांच्यावतीने पुरग्रस्तांना किराणा मालाच्या किटचे वाटप
पुरग्रस्तांना मदतीचा हात दिल्याने अनेकांनी मानले आभार
पंढरपूर –
परतीच्या पावसामुळे उजनी व वीर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्यामुळे नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांसह व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. हातातोंडाला आलेली पिके वाहून गेलेली आहे व घरात जे धान्य शिल्लक होते ते देखील महापूराच्या पाण्यामुळे खराब झालेले आहे. याची दखल घेवून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे साहेब यांनी या नदीकाठच्या पुरग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्याचे काम केलेले असून आज शिंदे साहेबांच्या माध्यमातून नदीकाठच्या पुरग्रस्त नागरिकांना किराणा मालाच्या किटचे वाटप सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांच्याहस्ते या उपक्रमाचा शुभारंभ पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटफळ या ठिकाणी करण्यात आला. पुरग्रस्तांना मदतीचा हात दिल्यामुळे अनेकांतून सुशिलकुमार शिंदे साहेबांचे आभार मानण्यात येत आहेत.
यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष नवनाथ आरे, संदिप गायकवाड, सुधाकर मासाळ,  गोरख माने, सिताराम पळसे, दिपक गोरे, रोहित गवळी, दिनेश कोळी, आकाश गुरव, दत्तात्रय माने, सोमनाथ आरे, संतोष कुंभार आदि युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मा.सुशिलकुमार शिंदेसाहेब हे नेहमीच या भागातील शेतकऱ्यांसह व सर्वसामान्य नागरिकांच्या  अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असतात. आता महापुरामुळे अडचणीत सापडलेल्या पुरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी नदीकाठच्या नुकसानग्रस्तांना किराणा मालाच्या किटचे वाटप करण्यात येत आहे व लवकरच तपकिरी शेटफळ व चिंचुब या गावातील सर्व नुकसानग्रस्तांपर्यंत मदत पोहोचविली जाणार आहे, अशी माहिती सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी दिलेली आहे.
चौकट-
सुशिलकुमार शिंदेसाहेबांनी जपले पंढरपूरचे ऋणानुबंध
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे साहेब हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना मदतीचा हात देत असतात. सुशिलकुमार शिंदे साहेबांचे पंढरपूरशी एक वेगळे नाते जोडलेले आहे. ते ऋणानुबंध जपण्याचे काम आजपर्यंत साहेबांनी केलेले आहे व अडचणीत आलेल्या सर्वांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शिंदे साहेब सदैव कटिबध्द आहेत अशी प्रतिक्रिया सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी दिलेली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

1 week ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago