घाट बांधणी कामाच्या ठेकेदारावर व जबाबदार अधिकाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा

घाट बांधणी कामाच्या ठेकेदारावर व जबाबदार अधिकाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा

शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

पंढरपूर शहरात काल कुंभार घाट येथे नव्याने बांधकाम सुरु असेलल्या घाटाची भीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ निष्पाप नागिरकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.सदर घाटाचे काम अतिशय निकृष्टपध्द्तीने होत असल्याची तक्रार शिवसेनेच्या वतीने काही महिन्यापूर्वीच करण्यात आली होती.मात्र तत्कालीन फडणवीस सरकारकडे या ठेकेदारासाठी आग्रही असेलल्या एका आमदाराने पाठराखण केल्यामुळेच व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याशी ठेकेदाराशी मिलीभगत असल्याने निकृष्ट पद्धतीने काम केले जात असतानाही डोळेझाक करण्यात येत होती.आता या निकृष्ट कामामुळेच ६ जणांचा हकनाक बळी गेला असून सदर प्रकरणी ठेकेदार व सदर कामाची जबाबदार असणारे प्रशासकीय अधिकारी यांच्यावर भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी आपण शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिली आहे.   

   या बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनानुसार या तीर्थक्षेताच्या ठिकाणी चंद्रभागा नदी काठी जलसंपदा विभागाच्या वतीने नव्याने घाट बांधणीचे काम गेल्या दोन वर्षपासून सुरु आहे. सदर काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत प्रशासनाकडे वेळोवेळी विविध व्यक्ती,संस्था,संघटना यांनी तक्रारी केल्या होत्या. तर शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही सदर गंभीर बाब जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणून देण्यात आली होती.मात्र या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले. सदर दगडी घाट बांधणीसाठी थेट मातीचा वापर भर म्हणून करण्यात येत होता त्यामुळे मोठी नाराजी व्यक्त होत होती व धोका वर्तवला जात होता. 

            बुधवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी दुपारी अतिवृष्टीचा फटका सहन न झाल्याने हि नव्याने बांधण्यात आलेली घाटाची दगडी भिंत कोसळून ६ निष्पाप नागिरकांचा बळी गेला असून हि बाब अतिशय वेदनादायक आणि संबंधित ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या अनास्थेचे,हलगर्जीपणाचे प्रतीक आहे.आणि सदर घटनेस पूर्णतः ठेकेदार व अक्षम्य दुर्लक्ष करणारे संबंधित अधिकारी जबाबदार आहेत. त्यामुळे आपण या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन सदर प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत व या नव्याने होत असलेल्या घाट बांधणीच्या कामाची सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.  

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

3 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago