पंढरपूर नगर पालिकेच्या वतीने रविवारी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ भव्य सायकल रॅलीचे आयोजन

पंढरपूर नगर पालिकेच्या वतीने रविवारी आयोजित ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ भव्य सायकल रॅली रद्द

माझे कुटूंब माझी जबाबदारी या महाराष्ट्र शासनाच्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियाना अंतर्गत पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने व पंढरपूर सायकल असोसिएशनचे संयुक्त विद्यमाने  पंढरी नगरीतील सर्व सायकलप्रेमींसाठी उद्या दिनांक 4 ऑक्टोबर 2020 रोजी भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होती, 

 या रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा येथून मा आमदार नगराध्यक्षा साधना भोसले,उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव,प्रांताधिकारी सचिन ढोले,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले ,मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर तसेच सर्व सभापती व नगरसेवक यांचे हस्ते झेंडा दाखवून होणार होते .

परंतु माझे कुटुंब माझी जबाबदारी याअंतर्गत पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने उद्या सकाळी सात वाजता पंढरपूर येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी व प्रांत साहेब यांचे निर्देशानुसार सदरची सायकल रॅली रद्द करण्यात आलेली आहे.
कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी कोणीही ही उद्या सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमू नये असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

11 hours ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 week ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago