नरसिह मंदिराच्या कळसारोहण सोहळ्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पंढरपुरातयेणार-राजू खरे

नरसिह मंदिराच्या कळसारोहण सोहळ्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पंढरपुरातयेणार-राजू खरे  

राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोपाळपूर ता.पंढरपूर येथील दोनशे वर्षे जुन्या असलेल्या नरसिह मंदिराच्या कळसारोहण सोहळ्यासाठी लवकरच पंढरपुरात येणार असल्याची माहिती या मंदिराचे जीर्णोद्धाराक राजू खरे यांनी पंढरी वार्ताशी बोलताना दिली आहे. 

      उत्तर नागपूरचे आमदार डॉ.मिलिंद माने यांचे सख्खे मावसभाऊ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्य सचिव  अनिलकुमार गायकवाड यांचे सख्खे मेहुणे व मूळचे पंढरपूरचे असलेले राजू खरे यांची गोपाळपूर तालुका पंढरपूर येथे शेतजमीन व फार्महाउस आहे.या ठिकाणी अतिशय पुरातन असे नरसिह देवतेचे मंदिर आहे.या मंदिराची मोठी महती असून राजू खरे यांनी सदर शेतजमीन खरेदी केल्यानंतर येथील या पुरातन अशा नरसिह मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प सोडला होता.या मंदिराचे प्राचीनत्व कायम ठेवत अतिशय चांगल्या पद्धतीने जीर्णोद्धार करण्यात आला आहे. 

  राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नरसिह हे कुलदैवत आहे. त्यामुळे त्यांच्या हस्ते सदर मंदिराचे कळसारोहन केले जावे यासाठी राजू खरे हे आग्रही होते. त्यांनी केलेल्या विनंतीला मान देत देवेंद्र फडणीवस यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्यास होकार दिला असून या बाबत तारीख व वेळ येत्या दोन तीन दिवसात जाहीर केली जाईल,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय मोजक्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल अशी माहितीही यावेळी त्यांनी दिली आहे.अशी माहिती राजू खरे यांनी दिली आहे     

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

7 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago