इसबावी येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाची पुन्हा मोठी कारवाई

इसबावी येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाची पुन्हा मोठी कारवाई 

५ वाहनांसह १८ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त 

पंढरपूर शहरानजीकच असलेल्या इसबावी या उपनगरालगतच्या नदीकाठच्या परिसरातून सातत्याने अवैध वाळू उपसा होत असलेले वारंवार झालेल्या कारवायांमुळे सिद्ध झाले आहे.२८ ऑगस्ट रोजी इसबावी नजीकच्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत जवळपास ३८ लाख रुपयांचा अनेक वाहनांसह मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला होता.मंगळवारी रात्री उशिरा पुन्हा याच परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाने अतिशय धाडसी कारवाई केली असून या कारवाईत ५ वाहनांसह १८ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.     

    या बाबत मिळालेल्या माहितीनुसार सदर प्रकरणातील फिर्यादी पो.कॉ.कल्याण भोईटे (नेमणूक पोलीस मुख्यालय संलग्न ग्रामीण पोलीस विशेष पथक) यांच्यासह सदर विशेष पथकातील पो.नि. व्ही.आर.बहिर,पो.कॉ ५३२ मदने,पो.कॉ.२१६५ झिरपे,पो.कॉ.५४३ हेंमाडे,पो.कॉ.१३३० जाधव हे खाजगी वाहनाने पेट्रोलींग करत असताना इसबावी येथून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु असल्याची त्यांना माहिती मिळाली.आपले वाहन दूर अंतरावर उभा करून सदर पोलीस कर्मचारी हे अवैध वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणी गेले असता तेथे त्यांना अवैध वाळू उपसा केलेले मोठं मोठे वाळूचे ढीग आढळून आले.व काही इसम चारचाकी वाहनातून सदर वाळू भरून नेत असताना आढळून आले.पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना गराडा घालताच ४ अज्ञात व्यक्ती अंधाराचा फायदा घेत पळून गेले. तर सदर प्रकरणी १) गणेश सुभाष झाडबुके २) उमेश राजू धोत्रे ३)विजय महादेव देशमुख 4)शुभम प्रकाश साबळे 5)प्रकाश ज्ञानेश्वर कांबळे 6)आकाश सुनील धोत्रे यांच्यासह इतर चार इसमा विरोधात कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.   तर  या प्रकरणी १) महिंद्रा पीक अप एम १३ आर ०९८१  अर्धा ब्रास वाळूसह अंदाजे किंमत ५ लाख ३५००  २) विना क्रमांकाचा अशोक लेलँड वाहन अर्धब्रास वाळूसह अंदाजे किंमत ६ लाख ३५००  ३) टाटा योद्धा बिगर आरटीओ क्रमांकाचे वाहन अर्धब्रास वाळूसह किंमत अंदाजे ६ लाख ३५०० तसेच दोन मोटार सायकली व खोरे पाटीसह इतर साहित्य असा एकूण अंदाजे १८ लाख ११ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.   

   कधी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाकडून तर कधी स्थानिक पोलीस प्रशासनाकडून इसबावी येथील अवैध वाळू उपशावर वारंवार कारवाई होत असताना महसूलचे संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी नक्की करतात तरी काय असा प्रश्न आता उपस्थित होवू लागला आहे.  

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

4 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago